नागपूर - काल पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूर जिल्ह्याच्या काटोल येथे राहणारे सुपुत्र भूषण सतई या जवानाला वीरमरण आले आहे. ही बातमी नागपूर जिल्ह्यात आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. नागपूरचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनीदेखील भूषण सतई यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी सदैव राहील, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
काल झाले शस्त्रसंधीचे उल्लंघन-
पाकिस्तानी लष्कराने शुक्रवार जम्मू काश्मीरातील उरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या ३ जवानांना वीरमरण आले होते. यातील २ जवान उरी सेक्टरमध्ये आणि एक जवान गुरेज सेक्टरमध्ये शहीद झाले. भारतानेदेखील प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा- आरबीआयकडून पंजाब नॅशनल बँकेला दणका; 1 कोटी रुपयांचा ठोठावला दंड