नागपूर - लग्नाला विरोध असल्याने दोन दिवसांपूर्वी नवीन कामठी येथे एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने धावत्या ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सावनेर तालुक्यातील तरुण आणि तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आत्महत्या करणाऱ्या दोघांत प्रेम संबंध ( Young Boy And Girl Committed Suicide ) होते. मात्र, दोघांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप खुलासा होऊ शकला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश प्रकाश लालबागे या तरुणाने आज ( सोमवार ) पहाटे त्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी समजताच किरण मारुती काकडे या तरुणीने आकाशचे घर गाठले. त्याला मृतावस्थेत बघून ती घरी परतली आणि त्यानंतर किरणने सुद्धा गळफास घेत आत्महत्या केली. आकाश आणि किरण यांच्यात प्रेम संबंध होते, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. आकाशने आत्महत्या केल्यामुळेच किरणने सुद्धा गळफास घेतल्याचे बोलले जात आहे. त्याआधारे सावनेर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. सावनेर पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.
दोन दिवसांपूर्वी प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या
दोन दिवसांपूर्वीच प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने प्रेमी युगुलांनी आत्महत्या केली होती. या प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे गाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती.
हेही वाचा - Sanjay Pandey Warns Delivery Boys : ...अन्यथा डिलिव्हरी बॉयसह कंपनीवरही कारवाई, आयुक्त संजय पांडेंचा इशारा