ETV Bharat / state

नागपुरातील प्रमुख मंदिरांच्या दानपेट्यांमध्ये खळखळाट; एफडी तोडून भागवावा लागतोय खर्च

नागपुरातील अनेक प्रसिद्ध मंदिरांना आपल्या मुदत ठेवी (फिक्स डिपॉझिट) देखील तोडाव्या लागत आहेत. मंदिरांची आवक गेल्या साडेसात महिन्यांपासून बंदच आहे. त्यामुळे अनेक संस्थांना आपला खर्च भागवणे देखील कठीण होऊन बसले आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Oct 29, 2020, 3:15 PM IST

नागपूर - गेल्या साडेसात महिन्यांपासून कुलूपबंद असलेले मंदिर कधी सुरू होतील, या निर्णयाकडे सर्व भक्तांच्या नजरा लागल्या आहेत. मंदिर बंद असले तरी मंदिराची रखरखाव करण्यासाठी लागणारा खर्च आणि कर्मचाऱ्यांचा पगार द्यावाच लागत असल्याने नागपुरातील अनेक प्रसिद्ध मंदिरांना आपल्या मुदत ठेवी (फिक्स डिपॉझिट) देखील तोडाव्या लागत आहेत. प्रसिद्ध साई मंदिर प्रशासनाला तब्बल अडीच कोटींच्या ठेवी तोडाव्या लागल्या आहेत. भक्तांना मंदिरात प्रवेश नसल्याने मंदिरांची आवक गेल्या साडेसात महिन्यांपासून बंदच आहे. त्यामुळे अनेक संस्थांना आपला खर्च भागवणे देखील कठीण होऊन बसले आहे.

मंदिरांची आवक गेल्या साडेसात महिन्यांपासून बंद...

कोरोना संकटाचा फटका सर्वच क्षेत्राला बसलेला आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे मंदिरांची आर्थिकघडी देखील विस्कळीत झाली आहे. अनलॉक नंतर आता बरेच उद्योगधंदे पुन्हा रुळावर येत आहेत. मात्र, मंदिराचं आर्थिक चक्र अजूनही अडकून पडल्याने आता पुढील खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न मंदिर संस्थांना पडला आहे.

मंदिरे सुरू करावी -

मंदिरात भक्तांना प्रवेशच नसल्याने, रोजचा खर्च भागवायला सुद्धा आता पैसे शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर मंदिरे सुरू करण्याला शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी साई मंदिर प्रशासनाने केली आहे. मंदिराला मिळणाऱ्या देण्यातून अनेकांचे रोजगार अवलंबून आहेत. मंदिराचे पुजारी, कर्मचारी, सफाई कामगारांसह विजेचा खर्च आणि भोजन व्यवस्था करण्यासाठी देखील निधीची गरज आहे. मात्र, आवकच नसल्याने सर्व काही कठीण होऊन बसल्याचे साई मंदिराचे सचिव अविनाश शेगावकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.