ETV Bharat / state

Nagpur Crime: गुन्हेगारांचा डेटाबेस तयार करण्यात नागपूर ग्रामीण पोलीस तिसऱ्या स्थानी - Jalna Police

महाराष्ट्र राज्य पोलीस दलाकरिता ( Maharashtra State Police Force ) महत्त्वाकांशी असलेल्या सीसीटीएनएस सिस्टमचा वापर करून गुन्हेगारांचा डेटाबेस तयार करण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांनी ( Nagpur Rural Police ) जून महिन्यात राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर पहिल्या क्रमांकावर जालना ( Jalna Police ) तर दुसऱ्या नंबरवर रायगड पोलिसांनी (Raigad Police ) बाजी मारली आहे.

Nagpur Rural Police
नागपूर ग्रामीण पोलीस
author img

By

Published : Aug 6, 2022, 3:07 PM IST

Updated : Aug 6, 2022, 5:35 PM IST

नागपूर - बदलत्या काळानुसार लहान-मोठे गुन्हेगार हायटेक झाले आहेत. त्यामुळे दुर्जनांची शक्ती काहीशी वाढलेली दिसते आहे. हे जरी पोलिसांसाठी आव्हानात्मक वाटत असले तरी पोलिसांनी देखील तंत्रज्ञानाची कास धरून गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतःची यंत्रणा विकसित केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे गुन्हे आणि गुन्हेगार ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम ( Criminal Tracking Network System ) (सीसीटीएनएस). या सिस्टीमच्या मदतीने पोलिसांनी १९९८ पासून गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाकरिता ( Maharashtra State Police Force ) महत्त्वाकांशी असलेल्या सीसीटीएनएस सिस्टमचा वापर करून गुन्हेगारांचा डेटाबेस तयार करण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांनी ( Nagpur Rural Police ) जून महिन्यात राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या क्रमांकावर जालना तर दुसऱ्या नंबरवर रायगड पोलिसांनी बाजी मारली आहे. सीसीटीएनएस सिस्टीम राज्यभरातील गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याची नोंद होताचं गुन्ह्याची आणि गुन्हेगाराची माहिती सीसीटीएनएस मध्ये फीड केली जाते. त्यामुळे एका क्लिकवर गुन्हेगारांची माहिती कुठेही आणि केव्हाही उपलब्ध होण्यास मदत मिळाली आहे.

काय आहे सीसीटीएनएस सिस्टम - राज्यभरातील पुणेकरांची माहिती एका क्लिकवर मिळावी या उद्देशाने 15 सप्टेंबर 2015 झाली क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टम क्रियानवीत करण्यात आले होते. या सिस्टीम मध्ये 1998 पासून गुन्हे आणि गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाल्यास त्या गुन्ह्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने सीसीटीएनएस प्रणालीवर भरली जाते. ही प्रणाली देशभरातील पोलीस ठाण्यात क्रियानवीत आहे. गुन्हेगारांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी ही प्रणाली पोलिसांसाठी वरदान ठरलेली आहे.

गुन्हेगारांचा डेटाबेस तयार करण्यात नागपूर ग्रामीण पोलीस तिसरा स्थानी

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या रँकिंग मध्ये सुधारणा - जून महिन्यात सीसीटीएनएस सिस्टीम चा उपयोग करून गुन्हे आणि गुन्हेगारांचा डेटाबेस तयार करण्यात नागपूर पोलिसांनी तिसरा क्रमांक जरी पटकावलेला आहे. गेल्या काही महिन्यांचे मूल्यमापन केले असता नागपूर ग्रामीण पोलिसांनी सातत्याने आपल्या रँकिंग मध्ये सुधारणा केल्याचं बघायला मिळत आहे. मे महिन्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना आठव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. तर एप्रिल महिन्यात नागपूर पोलिसांचा रँकिंग हा १५ होता. मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात तर नागपूर पोलीस १६ व्या स्थानी होते. जानेवारी महिन्यात नागपूर ग्रामीण पोलिसांची रँकिंक १५ होती.

सीसीटीएनएसमध्ये कोणते गुन्हे आणि गुन्हेगारांची नोंद केली जाते - क्राइम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम म्हणजेच सीसीटीएनएस मध्ये कोणते गुन्हे आणि गुन्हेगारांची नोंद केली जाते. याबद्दल माहिती उपलब्ध झाली आहे. दिवसभर विविध पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे एफआयआर ची नोंद केली जाते. त्याचबरोबर गुन्हे आणि गुन्हेगारांच्या संदर्भातील विस्तृत अहवालाची त्यामध्ये नोंद केली जाते. याशिवाय गुन्हेगाराला अटक करणे,हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, अनोळखी व्यक्तींचा शोध घेणे, अनोळखी व्यक्ती सापडल्याची नोंद, अनैसर्गिक मृत्यू प्रकरण, यासह एकूण 25 प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद या सीसीटीएनएस सिस्टीममध्ये केली केली जाते.

हेही वाचा :Swine flu positive in Nagpur : नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने गाठली पंच्याहत्तरी, 5 जणांचा घेतला बळी

Last Updated : Aug 6, 2022, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.