नागपूर - नागपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी यात थोडी घट होऊन पन्नाशीच्या आत असलेली मृत्यूसंख्या रविवारी (ता. 4 एप्रिल) पुन्हा वाढून 62 वर जाऊन पोहचली आहे. तर नव्याने कोरोना बाधित 4 हजार 110 रुग्णांची भर पडली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेला अधिक जलदगतीने वाढवण्यासाठी, लसीकरण सेंटर वाढवण्यात आले आहेत. लसीकरण सेंटरची संख्या 237 वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात 18 हजार 135 संशयितांची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये शहरात 2 हजार 906 बाधित मिळाले. तर 29 रुग्ण रविवारी दगावले आहेत. ग्रामीण भागात 1 हजार 200 बाधित मिळून आले असून 29 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णाची संख्या 41 हजार 371 इतकी झाली आहे.
नागपुरात रविवारी कोरोनामुळे 62 रुग्णांचा मृत्यू, 4 हजार 110 नव्या बाधितांची भर
नागपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी यात थोडी घट होऊन पन्नाशीच्या आत असलेली मृत्यूसंख्या रविवारी पुन्हा वाढून 62 वर जाऊन पोहचली आहे. तर नव्याने कोरोना बाधित 4 हजार 110 रुग्णांची भर पडली आहे.