ETV Bharat / state

Nagpur Rape Case : कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीवर जंगलात नेऊन बलात्कार, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल - गुन्हा दाखल

Nagpur Rape Case : वर्धा महामार्गावरील जामठा भागात एका कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. घटना घडून ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी अद्यापही आरोपीची ओळख पटलेली नाही, अशी माहिती शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

Nagpur Rape Case
नागपूर क्राईम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 1:59 PM IST

नागपूर Nagpur Rape Case : वर्धा महामार्गावरील जामठा भागात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना 4 ऑक्टोबरला घडली. मात्र, घटना घडून आता ४८ तासांपेक्षा अधिकचा कालावधी लोटलेला असताना देखील पोलीस आरोपीचा शोध लावू शकलेले नाहीत. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अनेक तपास पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणीवर अतीप्रसंग करणाऱ्या आरोपीची अद्याप ओळख पटलेली नसल्याची माहिती शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

कुऱ्हाडीचा दाखवला धाक : अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जवळ असलेल्या धारधार कुऱ्हाडीचा धाक दाखवत तरुणीला बळजबरीने जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसंच आरोपीने तरुणीला कुऱ्हाडीने जखमी केलं नसले तरी झटापटीत तरुणीच्या शरीरावर जखमा झाल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण : एका आरोपीने महाविद्यालयातील तरुणीचा पाठलाग सुरू केला. पीडित तरुणीला आरोपीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्यानंतर तिने लगेच बहिणीला फोन करत कल्पना दिली. पीडित तरुणीच्या बहिणीने लगेच महाविद्यालय प्रशासनाला ही बाब कळवली. मात्र, तोपर्यंत अज्ञात इसमाने पीडित तरुणीवर अतिप्रसंग केला. बहिणीने फोन केल्यानंतर लगेचचं महाविद्यालयतील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने हिंगणा पोलिसांचे पथकही घटनास्थळी आले होते. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार हिंगणा पोलिसात करण्यात आली.

सुरुवातीला पोलिसांनी केली टाळाटाळ : हिंगणा पोलिसांनी प्रथम दर्शनी ही छेडखानीची घटना असल्याने विशेष लक्ष दिलं नाही. मात्र, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, अहवाल बघून पोलिसांचीही तारांबळ उडाली. त्यानंतर नागपूरच्या सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, पोलीस उपायुक्त अनुराग जैन, ठाणेदार विशाल काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग जाधव यांच्यासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. प्रकरणाची चौकशी पोलिसांनी करून अज्ञात आरोपीविरुद्ध भांदवी ३७६, ३४१, ५०६(२), ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी हा मजूर किंवा लाकूडतोड्या असू शकतो. आरोपीच्या शोधासाठी स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक तयार करण्यात आलं आहे. तसंच घटनेचा पुढील तपास ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा -

  1. Nagpur Rape Case : नागपूर हादरलं; पाठलाग करत महाविद्यालयीन तरुणीवर अतिप्रसंग
  2. Family Dispute Crime : कौटुंबिक वादातून नागपुरात नवऱ्यानं केली बायकोची हत्या; तर बी़डमध्ये बापानं मुलावर अन् पत्नीवर केले वार
  3. Minor Burn Cigarette : आईच्या लिव्ह इन पार्टनरकडून चार वर्षाच्या चिमुकल्याला सिगारेटचे चटके, नराधमाकडून मुलांचा छळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.