नागपूर- संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचा सोमवारी ठिकाणा सापडल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. त्याचवेळी नागपूर पोलिसांनी विक्रम लँडरबाबत केलेले ट्वीट, ‘विक्रम’ कृपया प्रतिसाद दे, तू सिग्नल तोडलंस तरी आम्ही चालान फाडणार नाही,' हे सोशल मीडियावर चांगलच व्हायर झाले.
हेही वाचा-VIDEO : चांद्रयान २ चा संपर्क का तुटला, काय म्हणाले जेष्ठ वैज्ञानिक
यामुळे शिस्तप्रिय पोलिसांच्या या सेन्स ऑफ ह्युमरचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. वाहतूक नियमात दहापट दंड वाढल्याने सध्या देशभर नव्या मोटार वाहन कायद्याची लोकांना धास्ती लागली आहे. पण विक्रम तू सिग्नल तोडले तरी आम्ही चालान फाडणार नाही, असे नागपूर पोलिसांनी ट्वीट केले ते खुप व्हायरल झाले.