ETV Bharat / state

संचारबंदीत 'मुक्तसंचार' करणाऱ्यांना पोलिसांकडून चोप - कोरोना अपडेट

संचारबंदीच्या काळात नागपुरात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप द्यायला सुरुवात केल्याने रस्त्यावरील गर्दी आता ओसरत आहे. शासन आणि प्रशासनाकडून वारंवार सूचना करून देखील नागरिक ऐकत नसल्याने पोलीस विभागाने आक्रमक धोरण अवलंबले आहे.

Nagpur Corona Update
नागपूर कोरोना अपडेट
author img

By

Published : Mar 24, 2020, 9:20 PM IST

नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. नागपुरात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप द्यायला सुरुवात केल्याने रस्त्यावरील गर्दी आता ओसरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून वारंवार सूचना करून देखील नागरिक ऐकत नसल्याने पोलीस विभागाने आक्रमक धोरण अवलंबले आहे.

संचारबंदीत बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली

नागपूरच्या अनेक भागात आज भाजी आणि दूध घेण्यासाठी निघाल्याचे कारणे सांगून अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. सकाळच्या सत्रात पोलिसांनी लोकांची दैनंदिन वस्तूंची गरज पाहून सक्ती केली नाही मात्र, त्यानंतर पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना काठ्यांचा प्रसाद देणे सुरू केले. काहींना उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली.

हेही वाचा - CORONA VIRUS : 'संकट गंभीर.. पण सरकार खंबीर, कोणी संधी म्हणून पाहू नये'

तरुणाई अजूनही कोरोनाच्या संकटासंदर्भात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी आज दिवसभरात ३६६ लोकांवर कारवाई केली आहे. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम १८८ नुसार सहा लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त नाकेबंदी दरम्यान ३८७ लोकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.