ETV Bharat / state

नागपुरात वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन; ७ महिन्यात ५० हजारापेक्षा अधिक जणांवर कारवाई - नागपुरात वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन

नागपुरात अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे. त्यानुसार गेल्या ७ महिन्याच्या कालावधीत एकट्या नागपूर शहरात हेल्मेट न घालता वाहन चालवणाऱ्या ३८ हजार ६९३ वाहनधारकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे.

नागपुरात वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन, ७ महिन्यात ५० हजारापेक्षा अधिक जणांवर कारवाई
author img

By

Published : Aug 24, 2019, 3:15 PM IST

नागपूर - शहरात तरुण-तरुणींसह अनेकजण वाहतुकीचे नियम सर्रास मोडत सुसाट वेगाने गाडी चालवत असल्याचे चित्र आहे. गेल्या ७ महिन्यात एकट्या नागपुरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. वाहतूक विभागाने शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्याचा फारसा फायदा न झाल्याचे चित्र पाहायला मिळते.

नागपुरात वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन, ७ महिन्यात ५० हजारापेक्षा अधिक जणांवर कारवाई

शहराचे भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व मोठे आहे. त्यामुळे येथे देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांचा वावर बघायला मिळतो. त्यामुळे शहरात वास्तव्य करणाऱ्या लोकांची संख्या देखील २५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. सार्वजनिक परिवहनाच्या मुबलक सोयी उपलब्ध नसल्याने येथे राहणारे प्रत्येक नागरिक स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी वाहनावरच अवलंबून आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे.

गेल्या ७ महिन्याच्या कालावधीत एकट्या नागपूर शहरात हेल्मेट न घालता वाहन चालवणाऱ्या ३८ हजार ६९३ वाहनधारकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. तसेच सिग्नल तोडल्यामुळे दंड झालेल्या वाहन चालकांची संख्या २७ हजार २८० आहे. याशिवाय दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहे. मात्र, हा गुन्हा करणाऱ्या १२ हजार ९२८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ट्रिपल सीट, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे आणि कार चालवताना सीट बेल्टचा वापर टाळणाऱ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. मात्र, नागपूरकर वाहतुकीचे नियम का पाळत नाही? यावरच आता पोलीस विभागाला अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाहतूक पोलीस कधी-कधी सिग्नलवर उपस्थित नसतात. त्यामुळे वाहनधारकांना वाहतुकीचे नियम मोडत सुसाट वेगाने गाडी पळवत असतात. यामध्ये तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये शिवाय अनेक ठिकाणी ना-दुरुस्थ आणि बंद पडलेले सिग्नलमुळे देखील वाहन चालक नियम तोडत असतात.

Intro:मध्य भारतातात सर्वाधिक दुचाकींची संख्या असलेले नागपूर शहर वाहतुकीचे नियम मोडण्यातही आघाडीवर आहे..... गेल्या ७ महिन्यात एकट्या नागपुरात वाहतुकीची नियम मोडणाऱ्यांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे..... वाहतूक विभागाने शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी बरेच प्रयत्न केलेत,मात्र त्याचा फारसा फायदा झाल्याचे चित्र उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून तरी बघायला मिळत नाही आहे   Body:देशाच्या अगदी मध्यस्थानी वसलेल्या नागपूर शहराचे भौगोलिक,आर्थिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्वाच फार मोठे असल्याने देशाच्या प्रत्येक भागातील नागरिकांचा वावर इथे बघायला मिळतो.....शहराचा विस्तार मोठा असल्याने इथे नांदणाऱ्या लोकांची संख्या देखील २५ लाखांच्या घरात आहे....सार्वजनिक परिवहनाच्या मुबलक सोयी उपलब्ध नसल्याने इथे राहणार प्रत्येक नागरिक स्वतःची दुचाकी किव्हा चार-चाकी गाडीवरचा अवलंबून आहे,त्यामुळेच मध्य भारतातात सर्वाधिक दुचाकींची संख्या हि नागपूर शहरात आहे....व्हॅनची संख्या जास्त असल्यामुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे....गेल्या ७ महिन्याच्या कालावधीत एकट्या नागपूर शहरात हेल्मेट न घालता वाहन चालववणाऱ्या ३८६९३ वाहन धारकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे,तर सिंग्नल जम्प केल्यामुळे दंड झालेल्या वाहन चालकांची संख्या २७२८० इतकी आहे..... या शिवाय दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा असताना देखील हा गुन्हा करणाऱ्या १२९२८ तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे.... या व्यतिरिक्त ट्रिपल सीट,गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे आणि कार चालवताना सीट बेल्टचा वापर टाळणाऱ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई झाली असताना देखील नागपूरकर वाहतुकीचे नियम का पळत नाहीत यावरच आता पोलीस विभागाला अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे..... वाहतुकीचे नियम मोडताना वाहनधारकाच्या मनात पोलिसांची आदरयुक्त भीती असायला हवी,पण इथे वाहतूक सिंग्नल वर पोलीस कर्मचारीच हजार नसल्याने पाहून वाहनधारक आपली गाडी सुसाट पळवाट असल्याचे चित्र असून,या मध्ये तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे.शिवाय अनेक ठिकाणी ना-दुरुस्थ आणि बंद पडलेले सिग्नलस सुद्धा वाहन-चालकांना नियम तोडण्यास परावृत्त करत असतील 

बाईट- जयेश भांडारकर- वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.