नागपूर - जिल्ह्यात रुग्णसंख्या चाचणीच्या तुलनेत कमालीची घट झाली आहे. यात पॉझिटीव्हीटी दर हा 0.50 इतका आहे. मागील 24 तासात 9 हजार 413 जणांच्या चाचणीत 46 बाधित मिळून आले आहे. तेच 658 जण बरे झाले असून अजून बाधितांच्या तुलनेत जवळपास 14 पट जास्त रुग्ण बरे झाले आहे. दवाखान्यात उपचार घेणाऱ्याची रुग्णसंख्या ही घटली आहे. यात रिकव्हरी रेट 97.96 म्हणजे 98 टक्क्यावर आलेला आहे.
जिल्ह्यात नाही एकही मृत्यू -
जिल्ह्यात मंगळवारी आलेल्या अहवालात 9 हजार 413 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये 46 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. यात शहरी भागात 25 तर ग्रामीण भागात 20 बाधित रुग्णांचा समावेश आहे. शहर आणि ग्रामीणमध्ये शून्य मृत्यू तर बाहेर जिल्ह्यातील एक रुग्ण दगावला आहे. मागील 24 तासात 97 जणांपैकी शहरातील 62 तर ग्रामीणचे 35 जण कोरोना मुक्त झाले आहे. सक्रिय रूग्णांमध्ये 196 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 462 रुग्ण हे गृहविलगिकरणामध्ये आहेत.
सक्रिय रुग्णसंख्या घटून ६५८ -
आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्या घटून 658 वर आली आहे. शहरात 610 तर ग्रामीणमध्ये 48 रुग्ण सक्रिय आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 870 जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून 4 लाख 67 हजार 190 जण हे कोरोनातून बरे झाले आहे. यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 9022 वर जाऊन पोहचली आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेंट हा 97.96 टक्के इतका आहे.
सहा जिल्ह्यापैकी 3 जिल्ह्यात पाच जणांचा कोरोनाने मृत्यू -
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 202 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 131 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 5 जण हे कोरोनाने दगावले आहे. तेच भंडारा, गोंदिया, वर्धा या तीन जिल्ह्यात शून्य मृत्यूची नोंद आहे. यात कोरोना बाधितांच्या तुलेनेत 71अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. यात नागपूरातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 0.5 टक्के, तर पूर्व विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होऊन 0.73 इतकी झाली आहे.