नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दोन महिला सफाई कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल केला ( Nagpur Municipal Corporation Commi Radhakrishnan B ) आहे. रस्त्याची स्वच्छता केल्यानंतर गोळा झालेला कचरा हा कचरापेटीत न टाकता तो रस्त्यावर जाळल्या प्रकरणात कारवाई ( accumulated garbage burnt on road ) करण्यात आली आहे.
कचरा रस्त्यावर जाळला : महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा रस्त्यावर जाळला, त्यामुळे आणखी घाण तयार झाली याबाबत एका सजग नागरिकाने ट्विट करुन मनपा आयुक्तांना ट्विटरवर टॅग केले होते. यावर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी संबंधित विभागाला कारवाईचे निर्देश दिले होते. दोन्ही सफाई कर्मचाऱ्यांना नियम मोडल्यामुळे प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला ( Action On Municipal Corporation Women Worker ) आहे, त्याचा फोटो मनपा आयुक्तांनी त्या इसमाचा ट्विटला रीट्विट करताना जोडला ( Nagpur Municipal Corporation ) आहे.
मनपा आयुक्त सोशल मीडियावर 'अलर्ट': नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी सक्रिय असतात. तक्रार आल्यानंतर ती लगेच सोडवण्यासाठी ते संबंधित विभागांना सूचना देत असतात.