नागपूर - राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्या आणि उत्पादनांवर बंदी घातली असतानाही राज्यभर प्लास्टिकचा वापर सर्रासपणे सुरू आहे. या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर नागपूर महापालिकेने कारवाईस सुरुवात केली आहे. अशाच एका कारवाईत महापालिकेने दीड लाखांच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.
राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी राज्यभरात त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरूच आहे. या प्लास्टिक पिशव्यांची अवैधरीत्या वाहतूक करणारे एक वाहन चीचभवन परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने कारवाई करून सुमारे दीड लाख रुपयांच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केले आहे. याप्रकरणी वाहन चालक गिरीश मुरलीधर अदानी याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वाहनासह प्लास्टिकचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
हेही वाचा - कारमधून गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड
हेही वाचा - संघावर बंदी येईल तेव्हाच मनुवाद संपेल - चंद्रशेखर आझाद