नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मी नगर झोन येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत डॉ. वैशाली मोहोकर यांना निलंबित करण्यात आले आहे. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असतानाही देखील त्यांनी खासगी रुग्णालय सुरू केल्याच्या कारणावरून आयुक्त राधाकृष्ण बी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
डॉ. वैशाली मोहोकर या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांची नेमणूक ही नागपूर महानगर पालिकेच्या लक्ष्मीनगर झोन येथील वैद्यकीय अधिकारी होती. सध्याच्या कोविड काळात त्यांच्यावर विशेष जबाबदारी असताना देखील त्यांच्या आपल्या मूळ कर्तव्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक तक्रारी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या आधारे चौकशी करण्यात आली, ज्यात आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्याने महाराष्ट्र प्रशासकीय सेवा कायदा अंतर्गत डॉ. वैशाली मोहोकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर : आरोग्य विभागात कार्यरत असताना देखील खाजगी रुग्णालयात सेवा, डॉ. वैशाली मोहोकर निलंबित
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असतानाही देखील डॉ. वैशाली मोहोकर यांनी खाजगी रुग्णालय सुरू केल्याच्या कारणावरून आयुक्त राधाकृष्ण बी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.