नागपूर - आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात अधिक वेगाने विकास होईल आणि महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमाकांचे राज्य होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. गुरूवारी विधानसभा निवडणुकीच्या निकाल झाला. त्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दिल्लीला असल्याने त्यांनी व्हिडीओ द्वारे आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - उस्मानाबादमध्ये आघाडीचा सुपडा साफ, तुळजापूरवर प्रथमच भगवा
महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकला आहे. याबद्दल त्यांनी जनेतेचे आभारही मानले. यामुळे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विकास राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीही त्याच गतीने विकास होणार, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - उत्तर अहमदनगरमध्ये आघाडीने राखला गड, विखे-पाटलांचा फार्म्युला फेल
राज्यात भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणुक लढली. यानंतर जनतेने महायुतीच्या बाजून कौल दिल्याने आमच्यावर जबाबदारी आणखी वाढली आहे, असेही ते म्हणाले.