नागपूर - शहरातील ६ जागांसाठी भाजपच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत असल्याने विद्यमान आमदारांची धाकदूक वाढली आहे. शहरातील सर्व सहाही मतदारसंघाच्या जागेवर ८० पेक्षा जास्त इच्छूकांनी उमेद्वारीसाठी अर्ज भरल्याने विद्यमान आमदार धास्तावले आहेत. यातच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सूचक वक्तव्य केले आहे.
हेही वाचा - वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे लढवणार निवडणूक, अनिल परब यांचे सुचक वक्तव्य
नागपूर शहरात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. यावेळी बहुतांश उमेदवारांचे तिकीट कापले जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असताना इच्छुकांची गर्दी वाढली आहे. म्हणूनच आपला दावा सादर करण्यासाठी ८० इच्छुक समोर आले आहेत. सहापैकी काही मतदारसंघात भाजप चेहरा बदलण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींना चोर म्हटल्याने राहुल गांधींविरोधात गिरगाव न्यायालयात याचिका दाखल
‘काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना तिकीट मिळावी अशी अपेक्षा असते, आणि आज मुलाखती दिलेल्यांपैकी अनेकांना संधी आहे’ असे सूचक म्हणणं मांडत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक विद्यमान आमदारांची धाकदूक वाढवली आहे. तर दुसरीकडे आम्हाला पक्षाचा निर्णय मान्य राहील. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी आम्ही पक्षासोबत काम करत राहू असे मत काही विद्यमान आमदारांनी व्यक्त केले आहे. इच्छुकांच्या मुलाखतीशिवाय नागपूर शहर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक हरिभाऊ बागडे घेत असल्याचे वृत्त आहे. यात शहरातील सर्व विद्यमान आमदार, सर्व मंडळाचे अध्यक्ष आणि पक्षातील महत्वाच्या पदाधिकऱ्यांची उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा ही या बैठकीत घेण्यात येत आहे.
हेही वाचा - नारायण राणेंचा प्रवेश शिवसेनेसोबत चर्चा करूनच घेऊ - मुख्यमंत्री