ETV Bharat / state

नागपूर दुहेरी हत्याकांड : आरोपी आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटर, वेगळ्या धर्माचा असल्याने लग्नाला होता विरोध

आरोपी इकलाख हा आंतरराष्ट्रीय स्तरावर किक्रेट खेळलेला आहे. मात्र, त्याचे शिक्षण कमी असल्याने आणि तो जातीने मुस्लिम असल्याने त्यांच्या प्रेमाला विरोध होत होता. त्यामुळे त्यांनी चंपाती दाम्पत्यांची हत्या केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. यापूर्वी सुद्धा २ वेळा चंपाती दाम्पत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासाही झाला आहे.

नागपूर दुहेरी हत्याकांडात अटक केलेले आरोपी
author img

By

Published : Apr 16, 2019, 9:50 PM IST

नागपूर - शहरातील दुहेरी हत्याकांडाचा प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. शंकर चंपाती आणि त्यांची पत्नी सीमा चंपाती यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची दत्तक कन्या प्रियंका आणि तिचा प्रियकर इकलाखला अटक केली आहे. मात्र, आरोपी इकलाख हा आंतरराष्ट्रीय स्तरावर किक्रेट खेळलेला आहे. मात्र, त्याचे शिक्षण कमी असल्याने आणि तो जातीने मुस्लिम असल्याने त्यांच्या प्रेमाला विरोध होत होता. त्यामुळे त्यांनी चंपाती दाम्पत्यांची हत्या केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. यापूर्वी सुद्धा २ वेळा चंपाती दाम्पत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासाही झाला आहे.

कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

प्रियंका ही केवळ ६ महिन्यांची असताना तिच्या मूळ आई -वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर शंकर आणि सीमा चंपाती या दाम्पत्यानेच प्रियंकाचा सांभाळ केला. तिला उच्चशिक्षित केले. प्रियंका बारावीत असताना ९० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती, तर अभियांत्रिकीचे शिक्षण तिने ७५ टक्के गुण घेऊन पूर्ण केले आहे. अभ्यासात प्रचंड हुशार असलेली प्रियंका आयटी कंपनीत नोकरीला आहे.

प्रियंका ८ व्या वर्गात शिकत असताना शिकवणीच्या वर्गात इखलाक सोबत तिची ओळख झाली. ८ वी ते १२ वी पर्यंत दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दरम्यानच्या काळात आरोपी इकलाख हा भारताच्या अंडर १३, १६ आणि १९ वयोगटातील संघाकडून क्रिकेट खेळला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असून तो झिम्बाब्वे येथे सुद्धा खेळायला गेला होता.

दरम्यान प्रियंका इंजिनिअर झाली, तर इकलाखने १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्याच काळात प्रियंका आणि त्याच्यामध्ये प्रमेसंबंध निर्माण झाले. चंपाती दाम्पत्याला दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागल्याने ते तिच्यावर लक्ष ठेवून होते. इकलाख हा कमी शिकलेला होता. तसेच तो मुस्लिम असल्याने प्रियंकाच्या आई-वडिलांना त्यांचे नाते मंजूर नव्हते. त्यामुळे चंपाती दाम्पत्याबद्दल प्रियंकाच्या मनात राग निर्माण झाला. त्यानंतर तिने तिच्या प्रियकराच्या मदतीने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसला. अखेर त्यांनी त्यांचा डाव साधला आणि चंपाती दाम्पत्यांची हत्या केली.

आयटी प्रोफेशनल असलेल्या प्रियंकाने सर्व डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःचे फेसबुक अकाउंट डिलीट केले, तर पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये याकरता त्यांनी वारंवार स्वतःचे लोकेशन सुद्धा बदलून पोलिसांना भ्रमित करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. दोघांनीही स्वतःचे कॉल रेकॉर्ड देखील डिलीट केले होते. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला अटक केली.

Intro:नागपूरसह संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा तपास जस जसा पुढे जातोय तसं-तसे या प्रकरणात नवं नवीन खुलासे होऊ लागले आहेत...शंकर चंपाती आणि त्यांची पत्नी सीमा चंपाती यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी त्यांची दत्तक कन्या प्रियंका आणि तिचा प्रियकर इकलाखला अटक करण्यात आली आहे...पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता त्यांनी या पूर्वी सुद्धा 2 वेळा चंपाती दाम्पत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा झाला आहे

Body:प्रियंका ही केवळ सहा महिन्यांची असताना तिचे मूळ आई वडील एका अपघातात मृत्युमुखी पडले होते त्यानंतर शंकर आणि सीमा चपाती या दाम्पत्यानेच प्रियंकाचा सांभाळ केला तिला उच्चशिक्षित केले तिच्यावर चांगले संस्कार करताना तिच्या भावी आयुष्य करिता कोणतीही कमतरता राहू नये याची खबरदारी देखील त्यांनी घेतली होती प्रियंका बारावीत असताना 90 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती तर अभियांत्रिकीचे शिक्षण तिने 75 टक्के गुण घेऊन पूर्ण केले आहे अभ्यासात प्रचंड हुशार असलेली प्रियंका आयटी कंपनीत नोकरीला आहे...

प्रियंका ज्यावेळी 8 व्या वर्गात शिकत असताना शिकवण्याच्या वर्गात तिची ओळख इखलाक सोबत झाली...8 वी ते 12वी पर्यंत दोघांमध्ये चांगली मैत्री होती..दरम्यान च्या काळात आरोपी ईकलाख हा भारताच्या अंडर 13,16,आणि 19 संघा कडून क्रिकेट खेळला आहे....त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये चांगली कामगिरी केली असून तो झिम्बाब्वे येथे सुद्धा खेळायला गेला होता.....दरम्यानच्या काळात प्रियांका इंजिनिअर झाली तर इकलाक याने 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे क्रिकेटमध्ये करियर करण्याकरिता कदाचित त्याचे शिक्षण मागे पडले असावे...त्याच काळात त्याच्या आणि प्रियंकाच्या मैत्रीच्या नात्याला प्रेमाची किनार लाभली....दोघांनी सोबत जगण्या मारण्याच्या आणा-भाका सुद्धा खालच्या... चंपाती दाम्पत्याला दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागल्याने ते तिच्यावर लक्ष ठेवून होते....एकतर इकलाक हा कमी शिकलेला असून तो मुस्लिम असल्याने सुद्धा प्रियांका च्या आई वडिलांना त्यांचे नाते मंजूर नव्हते....ते येता-जात तिला प्रत्येक गोष्टी साठी टोकू लागल्याने तिच्या मनात आई वडिलांच्या बद्द्ल राग निर्माण होऊ लागला होता....तिने ही सल तिचा प्रियकर इकलाक कडे अनेक वेळा बोलून दाखवली होती...प्रियांका आणि इकलाक यांनी दोन वेळा शंकर चपाती यांना जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता मात्र त्यावेळी ते थोडक्यात बचावले होते मात्र अखेर दोघांनी आपला डाव साधून शंकर आणि सीमा चंपती यांना यमसदनी धाडले त्यात यश मिळवले हे गरज असताना आयटी प्रोफेशनल असलेल्या प्रियंकाने सर्व डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी स्वतःचे फेसबूक अकाउंट डिलीट केले तर पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये याकरिता त्यांनी वारंवार स्वतःचे लोकेशन सुद्धा बदलून पोलिसांना भ्रमित करण्याचा पूर्ण प्रयत्न केला एवढेच काय तर पोलिसांना कुठल्याही प्रकारचा संशय येऊ नये याकरिता दोघांनी स्वतःचे कॉल रेकॉर्ड देखील डिलीट केले होते मात्र पोलिसांच्या पुढे या दोन्ही आरोपींना काहीही ही चाललं नसल्याने त्यांचा भांडा फोड झालाय ज्या आई वडिलांच्या बद्दल मनात करुणेचा भाव असायला हवा त्या आई-वडिलांच्या संदर्भात इतका राग आणि संताप निर्माण होणे म्हणजे नात्यातील प्रेम संपले होते असेच नाईलाजाने म्हणावे लागेल

बाईट -निलेश भरणे- पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

वरील बातमीचे व्हिडिओ आपल्या एफ टी पी ऍड्रेस वर खालील नावाने सेंड केलेले आहेत एकूण चार बाईट्स फाइल्स आहेत...शिवाय काल आणि आज पाठवलेले फुटेज देखिल वापरता येईल... कृपया याची नोंद घ्यावी धन्यवाद
R-MH-NAGPUR-16-APRIL-DOUBLE-MURDER-SHOCKING-DISCLOSURE-HANANJAY

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.