ETV Bharat / state

Nagpur Crime News: बेपत्ता झालेल्या 'त्या' दोघांच्या खूनाचे गूढ उकलले; नदी पात्रात सापडला एकाचा अर्धवट जळालेला मृतदेह - Shot dead two person

दोन व्यक्ती 26 जुलै रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यापैकी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह नदीत मिळून आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. पैशाच्या वादातून गोळ्या घालून हत्या केली असल्याचे समोर आले आहे.

Nagpur Crime News
गोळ्या घालून हत्या
author img

By

Published : Jul 28, 2023, 10:04 AM IST

Updated : Jul 28, 2023, 10:15 AM IST

नागपूरमध्ये पैश्याच्या वादातून केली हत्या

नागपूर : नागपूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागातून बेपत्ता झालेल्या दोघांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोंढाली येथे असलेल्या फार्म हाऊसवर हत्येची घटना घडली आहे. यामध्ये अमरिश देवदत्त गोळे (वय ४१) आणि निरालाकुमार जयप्रकाश सिंग (वय ४३)अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही काही मित्रांसोबत कोंढाळी येथे रिंगणाबोडीत संजय तुर्केल नामक आरोपीच्या फार्महाउसवर गेले होते.

पैश्याच्या वादातून केली हत्या : तिथे पैशांच्या वादातून दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर दोन्ही मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी दोन्ही मृतदेह वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील वर्धा नदी पात्रात फेकून पळ काढला. त्यापैकी अमरिश गोळे यांचा मृतदेह शोधण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. निरालाकुमार जयप्रकाश सिंग यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

'असा' सुरू झाला घटनाक्रम : मंगळवारी दुपारी नागपुरात राहणारे ओंकार महेंद्र तलमले, हर्ष आनंदीलाल वर्मा, दानेश दुर्गाप्रसाद शिवपेठ, लकी संजय तुर्केल, हर्ष सौदागर बागडे यांच्यासह अमरिश गोळे आणि निरालाकुमार जयप्रकाश सिंग हे नागपूरच्या कोंढाळी येथील रिंगणाबोडी शिवारातील संजय तुर्केल यांच्या फार्महाउसवर गेले होते. दिनांक २६ जुलै रोजी पोलीस स्टेशन सिताबर्डी हद्दीत राहणारे निराला कुमार जयप्रकाश सिंग हरविल्याची 26 जुलैला तक्रार नोंद करण्यात आली होती. तसेच पोलीस स्टेशन सोनेगांव येथे अमरिश देवदत्त गोळे हे सुद्धा हरविल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. निरालाकुमार आणि अमरिश गोळे हे दोघेही मित्र होते. ते दोघे एकाचवेळी बेपत्ता झाल्याने काहीतरी घातपात झाल्याची शंका पोलिसांना आली होती.

पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात : नागपूर पोलिसांनी मृतकांच्या मित्रांची चौकशी सुरू केली असता पाच आरोपींनी संगनमत करून दोघांची निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर दोन्ही मृतकांचे शव वर्धा नदीच्या पात्रात शोधणे पोलिसांनी सुरू केले होते. त्यापैकी अमरिश गोळे यांचा मृतदेह वर्धा नदी पात्रात मिळून आला. निराला सिंग यांच्या प्रेताचा शोध पोलीस घेत आहे. गुन्हा ज्या ठिकाणी घडला ते स्थळ नागपूर ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत आहे. कोंढाली पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा :

  1. Satara Crime : महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला २१ वर्षांनी अटक
  2. Nagpur Crime News : धक्कादायक ! २४ तासात जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनेत चौघांची हत्या
  3. Militant Arrested In Pune: पुण्यात आणखी एका संशयित अतिरेक्याला अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी

Last Updated : Jul 28, 2023, 10:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.