ETV Bharat / state

नागपूरमधील 'आपली बस' सेवेच्या बसेसना चढतोय गंज; बस सेवा सुरु करण्याची मागणी

नागपूर शहरातील आपली बस सेवा बंद असल्यामुळे सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 5 महिन्यांपासून बसेस बंद असल्यामुळे बसेसना गंज चढत आहे. ५० टक्के बसेसच्या बँटरी, टायर, आसन व्यवस्था देखील खराब होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बसेसचे होणारे नुकसान महानगरपालिकेवर आर्थिक भार टाकणारे आहे.

bus service in nagpur
आपली बस सेवा सुरु करण्याची मागणी
author img

By

Published : Aug 26, 2020, 6:13 PM IST

नागपूर - राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून त्याचे पालन करत आंतरजिल्हा प्रवासाला मुभा देण्यात आली. मात्र, असे असले तरी शहरातंर्गत असलेल्या बस सेवा अजूनही बंदच आहेत. नागपुरातही सर्वांच्या हक्काची 'आपली बस' ही सेवा अजूनही बंदच आहे. गेल्या काही महिन्यांपासून सेवा बंद असल्याने बसेसना गंज चढला आहे. यातील ५० टक्के बसेसच्या बॅटरी, टायर, आसन व्यवस्था देखील खराब होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बसेस खराब होत असल्यामुळे होणारे नुकसान महानगरपालिकेसाठी अडचणीत टाकणारे आहे. नागपूरकरांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून सर्वच सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांचा होत असलेला खोळंबा पाहता आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करण्यात आली. जिल्हाअंतर्गत असणाऱ्या सार्वजनिक बस सेवा अजूनही बंदच आहेत. नागपुरातही 'आपली बस' सेवा अजूनही बंद आहे. नागपुरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रशासन काम करत आहे. मात्र, शहराची लाईफ लाईन समजली जाणारी 'आपली बस' सेवा बंद असल्यामुळे बसेसवर गंज चढत आहे. याचा थेट परिणाम महानगरपालिकेच्या तिजोरीवर होणार असल्याचे दिसून येत आहे.

एसटी बस सेवा सुरू होऊ शकते तर शहरातील बससेवा सुरू करायला हवी, अशी मागणीही नागपूरकर करत आहेत. मात्र, महानगरपालिका प्रशासन व राजकीय नेते मंडळी यांच्यातील वादामुळे बस सेवा सुरू करण्याकडे कोणीही लक्ष देताना दिसून येत नाही. ईटीव्ही भारतने अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. शहरातील बससेवा सुरू झाली नाही, तर ४०० पेक्षा अधिक बसेसचे भवितव्य धोक्यात जाणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र येत 'आपली बस' सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागाणीही नागरिकांकडून केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.