ETV Bharat / state

गुजरातमध्ये अपहरण करून पसार झालेल्या आरोपीला नागपुरात पकडले - नागपूर बेलतरोडी पोलिसांची कारवाई

बेलतरोडी पोलिसांनी गुजरात येथून पसार झालेल्या एका अपहरणकर्त्या आरोपीला अटक केली. मनोज नंदकिशोर व्यास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २२ लाखांची नगदीसह ३१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Feb 4, 2021, 3:45 PM IST

नागपूर - शहरातील बेलतरोडी पोलिसांनी गुजरात येथून पसार झालेल्या एका अपहरणकर्त्या आरोपीला अटक केली. मनोज नंदकिशोर व्यास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २२ लाखांची नगदीसह ३१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तो राजस्थान येथून बंगळुरूकडे पळून जात असताना नागपूर पोलिसांनी गुजरात पोलिसांच्या सुचनेवरून त्याला अटक केली.

नागपूर

दोन दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांना गांधीधाम पोलीस विभागाकडून माहिती मिळाली की, 'एचआर पासिंग' असलेली एक कार मध्यप्रदेश येथून निघालेली आहे, ती नागपूरमार्गे बंगळुरूकडे जाणार आहे. या सुचनेच्या आधारे नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेशकडून येणाऱ्या प्रत्येक मार्गावर नाकाबंदी लावली होती. संबंधित कार ही बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांजरी टोल नाका येथे दिसून आली. पोलिसांनी कार थांबवून चालकाची विचारपूस केली असता तो उडवाउडवीचे असमाधानकारक उत्तर देत असल्याने पोलिसांनी गाडीची झडती घेतली. त्यामध्ये २२ लाखांची रोकड आढळून आली. शिवाय आरोपीजवळ चार मोबाईलदेखील आढळून आले, ज्याचा उपयोग आरोपीने अपहरणाच्या गुन्ह्यात केला आहे.

काय आहे प्रकरण

१९ जानेवारीला गुजरात येथील गांधीधाम येथील मुकेश अग्रवाल नामक व्यापाऱ्याचे आरोपी मनोज नंदकिशोर व्यास आणि त्याच्या चार साथीदारांनी अपहरण केले होते. आरोपींनी त्या व्यापाऱ्याची सुटका करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची खंडणीदेखील वसूल केली. या प्रकरणातील चार आरोपींना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे, मात्र मुख्य आरोपी मनोज नंदकिशोर व्यास हा राजस्थान येथे पळून गेला होता. त्याच्या मागावर पोलीस असल्याने तो मध्यप्रदेश राज्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मध्यप्रदेश येथे आरोपी मनोजला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असताना तो नागपूरमार्गे बंगळुरूकडे निघाल्याची माहिती समजताच गुजरात पोलिसांनी या संदर्भात नागपूर पोलिसांसोबत संपर्क केला आणि त्याला अटक करण्यासाठी नाकेबंदी सुरू केली होती. ज्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.