नागपूर - कधी काळी सुंदर रस्त्याचं शहर म्हणून नागपूर शहराची ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षात नागपूरच्या रस्त्यांची दुर्दशा बघता. रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी परिस्थती झाली आहे. उच्च न्यायालयाने स्वत:च याचिका दाखल करत नागपूर महापालिका आयुक्तांना फटकारले. मेट्रोच्या कमामुळे खड्डे पडले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
हेही वाचा - नाशिक : भाजपची ताकद दुप्पट, फडणवीसच होणार मुख्यमंत्री - किरीट सोमय्या
ज्या ठिकाणी मेट्रोचे काम चालू नाहीत त्या ठिकाणीही २ ते ३ फूट खड्डे पडले असल्याने महापालिकेचा खोटारडेपणा उघड झाला आहे. खड्ड्यांबाबत सरकारच्या उदासीन धोरणाकडे बघता उच्च न्यायलायने स्वतःच याचिका दाखल केली होती. न्यायालयाने मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना याबाबत विचारणा केली की, रस्त्यांची अशी अवस्था का? तुम्ही काय उपाययोजना केली आहे. अशी नोटीसच न्यायालयाने महापालिकेला पाठवली आहे. ज्याबाबत २३ सप्टेंबरपर्यंत आयुक्तांना उत्तर सादर करावे लागणार आहे.
'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी मोनिका अक्केवार यांनी खड्ड्यांबाबत आढावा घेतला आहे.
हेही वाचा - ई-सिगरेट बंदीच्या घोषणेवरून किरण मुझुमदार शॉ यांचा आक्षेप; सीतारामन यांनी 'हे' दिले उत्तर