नागपूर : नागपूर अधिवेशनात ( Nagpur Assembly Session ) अनेक आमदार त्यांच्या मतदार संघातील प्रश्न मांडताता लक्षवेधींवर चर्चा करतात . आजही अनेक लोकप्रतिनीधी त्यांच्या मतदार संघातील प्रश्न उपस्थित करतील. यात शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा, तसेच शिक्षकांची नेमणूक, गोपाळ कृष्ण गोखले पूल पुर्नबांधणी, अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे.
आरोग्य तपासणीपासून विद्यार्थी वंचित : सुनिल शिंदे, विलास पोतिनीस, आरोग्य तपासणीपासून वंचित विद्यार्थी आणि सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार ( Students Health Examination Not Done ) आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून २०२१-२२ या वर्षात केवळ २४ टक्के विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तब्बल ७६ टक्के विद्यार्थी अद्यापही आरोग्य तपासणीपासून वंचित राहिले. असल्याची बाब प्रजा फाउंडेशन या स्वयंसेवी सांस्थेने दि. ५ डिसेंबर, २०२२ रोजी प्रसिद्ध केली. अहवालावरून समोर आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून होणारी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ही विभागाचा सर्वोत्तम उपक्रमांपैकी एक आहे. तरीदेखील बृहन्मुंबई महानगरपानलका शाळेत शिक्षण घेत असलेल्या 3 लाख अठरा हजार दोन विद्यार्थ्यांपैकी केवळ ८४ हजार २४७ विद्यार्थ्यांची आजतागायत आरोग्य तपासणी करण्यात आली यावर चर्चा होणार ( Discussion On Attention Grabbing Instruction ) आहे.
राज्यातील शाळांत शिक्षकांची नेमणूक : जयंत आसगावकर, नागोराव गाणार, शिक्षकांची नेमणूक आणि सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे शालेय शिक्षण मंत्र्यांचे लक्ष ( Teachers Recruitment in Schools ) वेधतील. "राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च मार्ध्यामक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवत्तेचा दर्जा कमी होत चालला आहे. अजूनही साडेतीन लाखाहून अधिक मुले शाळाबाह्य आहेत, संचमान्यतेचे निकष बदलून गणित, विज्ञान,इंग्रजी, हिंदो-उरदू, मराठी, समाजशास्त्र विषयांना स्वतंत्र शिक्षक मिळण्याची आवश्यकता आहे. दुर्गम व मागास भागातील कमी पटसंख्येच्या शाळांना संरक्षण देण्याची आवश्यकता असणे, याशिवाय कार्यानुभव विषयांतर्गत संगणक साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक शाळेत 1 शिक्षक पद निर्माण करण्याची आवश्यकता असणे याबाबत तातडीने दखल घेऊननिर्मय घेण्यावर चर्चा होणार आहे.
गोपाळ कृष्ण गोखले पूल : "धोकादायक म्हणून जाहिर केलेला अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले पूल पुर्नबांधणीसाठी दिनांक ७ नोव्हेंबर, २०२२ पासून संपूर्णतः बंद करण्यात ( Gopal Krishna Gokhale Bridge ) आला. त्यामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडीसह परिसरातील नागरिकांना असंख्य गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पूलाच्या पुर्नबांधणीचे काम युध्दपातळीवर हाती घेऊन लवकरात लवकर पुनर्रचित पूल वाहतुकोसाठी कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी लोकप्रतिनिधींना केली जात आहे. त्याबाबत प्रसाद लाड मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहेत.