नागपूर - जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वत्र त्रासदायक आणि भीतीदायक परिस्थिती दर्शवणारे आकडे आता कमी होत चालले आहे. मृत्यूची शंभरी असून यात तीन अंकी संख्या एक अंकी झाली. त्याहून अधिक म्हणजे मृत्यूची संख्या दहाच्या आत येऊन पोहोचल्याने ही नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. यात गुरुवारी आलेल्या नव्याने बाधितांची संख्या १९० वर आल्याने परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे.
नवे १९० रुग्ण -
जिल्ह्यात गुरुवारी आलेल्या अहवालात ११ हजार ३५४ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये १९० जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये शहरी भागात १२१ तर ग्रामीण भागातील केवळ ६५ बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच ८ जण दगावले आहे. यामध्ये शहरी भागात २, ग्रामीण भागात २ तर जिल्ह्याबाहेरील ४ जण दगावले आहेत. तेच ५२९ जणांपैकी शहरात २६० तर ग्रामीण २६९ जण कोरोना मुक्त झाले आहे. यात १७४२ जण हे रुग्णालयात उपचार घेत असून ३ हजार ७४ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहे.
आतापर्यंतची परिस्थिती -
आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्येत घटून ४ हजार ८१६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ४ लाख ७५ हजार २०२ जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून ४ लाख ६१ हजार ४५३ जण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात मृत्यूचा आकडा हा ८९३३ वर जाऊन पोहचली आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेट हा ९७.११ टक्क्यांवर वर जाऊन पोहचला आहे.
सहा जिल्ह्यात बधितांची संख्या ७४१ -
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात १ हजार ३८४ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात ७४१ नवीन बधितांची नोंद झाली आहे. २९ जण हे कोरोना आजराचे बळी ठरले आहे. यात बाधितांच्या तुलेनेत ६०७ अधिकचे रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात नागपूरचा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर १.७ टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत ३.४४ वर आला आहे.
हेही वाचा - केंद्र सरकार 'या' कंपनीकडून ३० कोटींची कोरोना लस करणार खरेदी