ETV Bharat / state

फडणवीस सरकारमध्ये ६६ हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर? - CAG report During winter session nagpur latest news

एखादे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत सादर करायचे असते. हे प्रमाणपत्र काम योग्यरित्या पूर्ण झाल्याचे असते. मात्र, २०१८ पर्यंत विविध कामांसाठी दिलेल्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्र सादर केली नसल्याचे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे.

cm devendra fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 20, 2019, 5:08 PM IST

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यात २०१८ पर्यंत झालेल्या ६६ हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर झाली असल्याचा संशय नियंत्रक आणि महालेखापरीक्षकने (कॅग) आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. आज (शुक्रवारी) विधानसभेत हा अहवाल सादर करण्यात आला.

CAG Report on fadanvis government
नियंत्रक आणि महालेखापरीक्षकचा (कॅग) अहवाल

एखादे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत सादर करायचे असते. हे प्रमाणपत्र काम योग्यरित्या पूर्ण झाल्याचे असते. मात्र, २०१८ पर्यंत विविध कामांसाठी दिलेल्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्र सादर केली नसल्याचे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र, 2018 पर्यंतच्या कालावधीत ६५ हजार ९२१ कोटी रुपयांच्या कामाची ३२ हजार ५७० उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत. उपयोगिता प्रमाणपत्रे मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिल्याने निधीचा दुरुपयोग आणि अफरातफरीचा धोका संभवतो असा खळबळजनक संशय कॅगने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. आज (शुक्रवारी) विधानसभेत हा अहवाल सादर करण्यात आला.

हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : विधानसभेचे कामकाज सुरू; नियंत्रक व महालेखा शिक्षकांचा अहवाल पटलावर

सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या -

२०१६-२०१७ पर्यंत सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या - १३०६७ - कामांची किंमत - २८८९४ कोटी
२०१६-२०१७ वर्षात सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या - ४०२७ - कामांची किंमत - १२३०१ कोटी
२०१७-२०१८ वर्षात सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या - १५४७६ - कामांची किंमत - २४७२५ कोटी

Intro:Body:mh_mum_asembly_devendra_ cag_day5_nagpur_7204684

फडणवीस मुख्यमंत्री असताना ६६ हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर?
- नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा ठपका

नागपूर:राज्यात २०१८ पर्यंत झालेल्या ६६ हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर झाली असल्याचा संशय कॅगने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. एखादे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत सादर करायचे असते. काम योग्यरित्या पूर्ण झाल्याचं हे प्रमाणपत्र असतं. मात्र २०१८ पर्यंत विविध कामांसाठी दिलेल्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्र सादर केली नसल्याचं कॅगने आपल्या अहवालात म्हटलं आहे. मात्र 2018 पर्यंतच्या कालावधीत ६५ हजार ९२१ कोटी रुपयांच्या कामाची ३२ हजार ५७० उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत. उपयोगिता प्रमाणपत्रे मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिल्याने निधीचा दुरुपयोग आणि अफरातफरीचा धोका संभवतो असा खळबळजनक संशय कॅगने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. आज विधानसभेत हा अहवाल सादर करण्यात आला.

ग्राफीक्स

२०१६-१७ पर्यंत सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या - १३०६७ - कामांची किंमत - २८८९४
२०१६-२०१७ वर्षात सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या - ४०२७ - कामांची किंमत - १२३०१
२०१७-२०१८ वर्षात सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या - १५४७६ - कामांची किंमत - २४७२५Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.