ETV Bharat / state

नागपूर उन्हाळ्याच्या पावलांनी जलसंकटाची चाहूल

सद्या परिस्थितीत नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये अवघा १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा जुलैपर्यंतची तहान भागवणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

author img

By

Published : Feb 17, 2019, 12:36 PM IST

water issue

नागपूर - गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने राज्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्य स्थितीत राज्यातील जलसाठ्यांमध्ये फक्त ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १६ टक्क्यांनी कमी आहे. पाणीटंचाईच्या प्रश्नावर मात करण्यासाठी सरकारकडून उपाय योजना करण्यात येणार असल्याचे, प्रशासनाकडून म्हटले जात आहे. मात्र, सरकार उपाय योजना करत नसल्याने मत स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सद्या परिस्थितीत नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये अवघा १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा जुलैपर्यंतची तहान भागवणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अवघा ३४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला ६५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्यातून ३० लाख लोकांची तहान भागवली जाते. याच कारणामुळे पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, या परिस्थिवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याचा आरोप स्थानिक करत आहे.

राज्यातील जलसाठ्यांमधील विभागवार पाणीसाठा

विभाग - यावर्षीचा पाणीसाठा - गेल्यावर्षीचा पाणीसाठा

अमरावती -३६ टक्के - २७ टक्के

औरंगाबाद - ११ टक्के - ४८ टक्के

undefined

नागपूर - १९ टक्के - २५ टक्के

नाशिक - ३५ टक्के - ५८ टक्के

पुणे - ५३ टक्के - ६८ टक्के

कोकण - ६१ टक्के - ६७ टक्के

एकूण संपूर्ण महाराष्ट्रातील यावर्षीचा पाणीसाठी ३८ टक्के तर मागील वर्षी हा जलसाठा ५४ टक्के होता.

Intro:नागपूर

उन्हाळ्याच्या पावलांनी जलसंकटाची चाहूल

राज्यातील धरणात ३८ टक्केच पाणीसाठा

नागपूर विभागात १९ टक्के पाणीसाठा

हिवाळा संपत आलाय आणि उन्हाळ्याची चाहूल लागलीय. पण उन्हाळ्याची चाहूलंच राज्यात पाणीटंचाई घेऊन आल्याची स्थिती सध्या महाराष्ट्रात आहे.
राज्यात यंदा भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत १६ टक्के कमी पाणी आहे
राज्यातील धरणांमध्ये सध्या ३८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.Body:नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा १९ टक्केच, तर औरंगाबाद विभागात अवघा ११ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यावर साडेपाच महिने राज्याची तहान कशी भागणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राज्यातील जनतेला आणि सरकारलाही चिंता करायला लावणारी ही जलसंपदा विभागाची आकडेवारी आहे सध्या राज्यातील धरणात अवघा ३८ टक्केच पाणीसाठा उरलाय. या पाण्यात पुढील साडेपाच महिने राज्यातील जनतेची तहान कशी
भागणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

राज्यातील धरणांमधील विभागवार
पाणीसाठा

विभाग पाणीसाठा गेल्यावर्षीचा पाणीसाठा

अमरावती ३६ टक्के २७ टक्के

औरंगाबाद ११ टक्के ४८ टक्के

नागपूर १९ टक्के २५ टक्के

नाशिक ३५ टक्के ५८ टक्के

पुणे ५३ टक्के ६८ टक्के

कोकण ६१ टक्के ६७ टक्के

एकूण टक्के - ३८ टक्के ५४ टक्के
Conclusion:नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात सध्या अवघा ११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अवघा ३४ टक्केच पाणीसाठा शिल्लक. आहे उपराजधानीत सध्या रोज ६५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. ३० लाख लोकांची तहान भागवण्यासाठी नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या
धरणातंही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळेच जपून पाणी वापरण्याचा सल्ला दिला जातोय सध्या राज्याच्या अनेक भागात भीषण पाणीटंचाई आहे. विदर्भातील यवतमाळ, अकोला, वर्धा आणि नागपूरच्या काही भागातंही पाणीटंचाईची सुरुवात झालीय. उन्हाळ्याच्या तिव्रतेनुसार हे जलसंकट आणखी तीव्र होणार आहे.

बाईट- सचिन द्रवेकर, जनसंपर्क प्रमुख, ओसीडब्लू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.