नागपूर - यंदा ईदच्या सणावर देखील कोरोनाचे सावट आहेत. त्यामुळे ईद हा सण मुस्लीम बांधवांनी घरीच साजरा करावा, असे आवाहन नागपूर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नागपूरचा मोमीनपुरा हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. या परिसरातील दोनशेहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मोमीनपुरा या मुस्लीम समाज बहुल परिसरातील मुस्लीम बांधवांनी घरीच ईद साजरी करावी व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
पोलिसांच्या या आवाहनाला साथ देण्यासाठी मुस्लीम धर्मगुरू देखील पुढे सरसावले आहेत. मुस्लीम बांधवांनी घरीच नमाज पठाण करून ईद साजरी करावी, असे आवाहन मुस्लीम धर्मगुरूंनी केले आहे.