नाशिक Nagaur Murder Case : सर्वत्र दिवाळीचा सण (Diwali 2023) मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नाशिकमधूनन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये फटाके उडवण्याच्या वादातून एका 28 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, गौरव तुकाराम आखाडे (वय 30, रा.पाथर्डी फाटा,नाशिक) असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे.
फटाके फोडण्यावरून झाला वाद : रविवार 12 तारखेला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाथर्डी गावातील स्वराज्य नगर येथे मयत गौरवच्या घराबाहेर त्याच्या शेजारी राहणारे शिंदे कुटुंबीय फटाके फोडत होते. यावेळी आखाडे याने लहान मुले दचकतात म्हणून फटाके मैदानात फोडण्यास सांगितलं. मात्र, त्यावेळी काही युवकांशी फटाके फोडण्यावरून वाद झाला. यानंतर काल त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर शिंदे कुटुंबियातील काहींनी रागाच्या भरात आखाडे याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानं त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर दोघेजण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अशी घडली घटना : लक्ष्मीपूजनच्या दिवशी पाथर्डी फाटा येथील स्वराज नगर परिसरामध्ये गणेश शिंदे, नारायण शिंदे त्याचे वडील बबन शिंदे तसंच बबन शिंदे यांची पत्नी आणि मुलगी दहा ते बारा जणांसोबत फटाके उडवत होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गौरव आखाडे यांच्या घराकडे ते रॉकेट आणि अन्य फटाके उडवत असल्यानं गौरव आखाडे यांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर गौरव यांनी मोबाईलमध्ये त्यांचं शूटिंग सुरू केलं. यावेळी फटाके फोडणाऱ्यांनी आखाडे यांचा मोबाईल घेऊन पळ काढला. त्यामुळं आखाडे त्यांच्या मागे धावत असताना दहा ते बारा जणांनी त्यांच्यावर कोयत्याने हाता,पायावर, पोटावर वार केला. गौरव यांना त्यांच्या पत्नीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णाला दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सपना आखाडे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -