नागपूर - कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या एमपीएसी परीक्षा अखेर पार पडली. चार वेळा विविध कारणांनी रद्द झालेली परीक्षा रविवारी (२१ मार्च) घेण्यात आली. नागपूर शहरात लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहचण्यास अडचण येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोना लॉकडाऊनमध्ये हाल होऊन नये म्हणून झोन-2 च्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींच्या जेवणाची सोय केली होती.
कोरोनामुळे विविध केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात आली. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, हॅन्डग्लोव्हज्, मास्क देण्यात आले. त्यानंतरच परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला. अनेक विद्यार्थी दुसऱ्या जिल्ह्यातून आले होते. शहरात लॉकडाऊन असल्याने त्यांना दुपारच्या वेळी जेवणासाठी भटकावे लागू नये. यासाठी पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी 'व्ही सेवन' या संस्थेच्या मदतीने फूड पॅकेट दिले आणि दोन पेपवरच्या मधल्या काळात मुलांच्या जेवणाची सोय करून दिली.
हेही वाचा - मेयो रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर तांत्रिक कारणाने पडले बंद, आग लागल्याची अफवा