ETV Bharat / state

Nagpur Police Survey : नागपूरच्या ग्रामीण भागात दुपारी 4 ते रात्री 8 दरम्यान सर्वाधिक अपघात - nagpur accident latest news

नागपूर ग्रामीण पोलिसांनी ( Nagpur Rural Police ) वाढलेल्या अपघाताबाबत एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार ग्रामीण भागात दुपारी 4 ते रात्री 8 च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. यासाठी आता पोलिसांकडून नियम पाळण्यासंदर्भात उपक्रम हाती घेतला जाणार आहे.

Nagpur Accident News
Nagpur Accident News
author img

By

Published : Jan 9, 2022, 7:53 PM IST

नागपूर - मागील काही महिन्यांपासून नागपूर ग्रामीणच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या अपघातांची संख्या ( Nagpur Accident News ) वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या ग्रामीण पोलिसांनी एक सर्वे ( Nagpur Police Survey ) केला होता. त्यानूसार, ग्रामीण भागात दुपारी 4 ते रात्री 8 च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच, या अपघातांमध्ये मोठ्या संख्येने तरुण बळी पडत आहे. त्यासाठी आता ग्रामीण पोलिसांकडून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात उपक्रम हाती घेतला जाणार आहे.

नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

या कारणांनी घडले अपघात

नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण ( Nagpur Rural Area ) भागात अपघातांची संख्या वाढतच आहे. त्यासाठी जिल्हात मार्ग सुरक्षा अभियान राबवण्याची योजना पोलिसांनी आखली आहे. मात्र, त्यापूर्वी होणाऱ्या अपघातांच्या संदर्भात अभ्यास करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी 2021 या वर्षात झालेल्या अपघातांची संख्या तपासली. तेव्हा दुपारी 4 ते रात्री 8 या वेळात सर्वाधिक अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. वेगाने गाडी चालवणे, चुकीच्या मार्गाने गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे या कारणांनी सर्वाधिक अपघात घडले आहे. त्याच अनुषंगाने आता भविष्यात अपघातांची संख्या कमी होण्यासाठी वर्ग आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

दुपारी 4 ते रात्री 8 दरम्यान सर्वाधिक अपघात

नागपूर पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात मध्यरात्री 12 ते पहाटे 4 च्या दरम्यान एकूण 37 अपघात झाले. पहाटे 4 ते सकाळी 8 दरम्यान 64 अपघात झाले तर सकाळी 8 ते दुपारी 12 च्या दरम्यान एकूण 139 अपघात घडले. दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान 239 अपघाताची नोंद झाली तर दुपारी 4 ते रात्री 8 च्या दरम्यान सर्वाधिक 340 अपघात झाले आहेत. याशिवाय रात्री 8 ते 12 मध्यरात्रीच्या दरम्यान 160 अपघात झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - Jitendra Avhad on OBC Reservation : मी आजही वक्तव्यावर ठाम - मंत्री जितेंद्र आव्हाड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.