नागपूर - राज्यातील काही भागात कोरोना बधितांची रुग्णसंख्या वाढत असताना उपराजधानीत तिसऱ्या दिवशी एक हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी नागपूरमध्ये 1074 रुग्णांची भर पडली. तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सर्वाधिक 12396 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात वाढवण्यात चाचण्या -
तीन दिवसांपासून नागपूरमध्ये एक हजारच्यावर रुग्ण मिळत आहे. पूर्व विदर्भात जिथे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या चार जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या 50 च्या जवळपास असताना, वर्ध्यात मात्र, 205 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता शनिवार आणि रविवार नागपूर आणि वर्ध्यात लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी नागपूरमध्ये आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. नागपूरमध्ये दिवसभरात 12396 जणांचे नमुने तपासण्यात आले आहे. यापैकी 8541 आरटीपीसीआर, तर 3855 अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत.
पूर्व विदर्भात 1402 कोरोना बधितांची नोंद -
पूर्व विदर्भात नागपूरात 1074 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. यात वर्धा 205, यानंतर चंद्रपूर 45, भंडारा 44, गडचिरोली 23 तर सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 11 रुग्ण हे गोंदिया जिल्ह्यात आढळून आले आहेत. तेच पूर्व विदर्भात 1135 जण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांच्या आकडेवारीच्या तुलनेत आज मृत्यूच्या संख्येत घट असून नागपूर जिल्ह्यात 6 तर भंडारा चंद्रपूर प्रत्येकी एक प्रमाणे 8 जणांचा पूर्व विदर्भात कोरोनाने मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; एप्रिल-मे २०२१ मध्ये होणार परीक्षा