ETV Bharat / state

नागपुरमध्ये म्यूकरमायकोसिस रुग्णसंख्या वाढतेय; अकराशेच्यावर बाधित आढळले - mucormycosis patients nagpur

नागपूर शहरात एक जूनला एका दिवसात 25 रुग्णाची नोंद झाली आहे. तर मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मेला 26 म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे दोन दिवसात 51 रुग्ण मिळून आले आहेत. शासकीय दंत महाविद्यालयातील रुग्णालयात सुरुवातीला 40 ते 45 रुग्ण मिळून आले असताना खळबळ निर्माण झाली होती. मात्र, सध्याच्या घडीला शासकीय महाविद्यालयात सर्वाधिक 150 रुग्ण मिळाल्याची नोंद आहे.

more than eleven hundered mucormycosis patients found in nagpur
म्यूकरमायकोसिस रुग्णसंख्या वाढतेय
author img

By

Published : Jun 2, 2021, 10:31 AM IST

नागपूर - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना म्यूकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. नागपूर जिल्ह्यात म्यूकरमयकोसिसची रुग्णसंख्या अकराशेच्या पार पोहोचली आहे. याबरोबरच म्यूकरमायकोसिसमुळे 100 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा रोग आता अधिक घातक ठरताना दिसून येत आहे. शहरातील 64 रुग्णलयांसह मेयो मेडिकल आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील म्युकर मयकोसिसची परिस्थिती -

नागपूर शहरात एक जूनला एका दिवसात 25 रुग्णाची नोंद झाली आहे. तर मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मेला 26 म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे दोन दिवसात 51 रुग्ण मिळून आले आहेत. शासकीय दंत महाविद्यालयातील रुग्णालयात सुरुवातीला 40 ते 45 रुग्ण मिळून आले असताना खळबळ निर्माण झाली होती. मात्र, सध्याच्या घडीला शासकीय महाविद्यालयात सर्वाधिक 150 रुग्ण मिळाल्याची नोंद आहे. तर 15 रुग्ण दगावले आहे. दुसरीकडे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजेच मेयोमध्ये 64 रुग्ण उपचारासाठी मिळून आले आहेत. तर 5 रुग्ण दगावले आहे. नागपूर ग्रामीणमध्ये 20 रुग्ण मिळून आले असून यात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नागपूर मनपा क्षेत्रातील खासगी रुग्णालयात 886 रुग्ण मिळून आले आहेत. तर 85 रुग्ण दगावले आहेत. यात 107 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर म्यूकरमायकोसिस बाधितांची एकूण 1 हजार 122वर पोहोचली आहे.

हेही वाचा - 'चंद्रकांत पाटलांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही'; शिवसेना प्रवक्त्यांची टीका

पूर्व विदर्भातील म्युकरची रुग्णसंख्या -

एकूण रुग्णसंख्येत चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 74 रुग्णाची नोंद आहे. तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यात 13, गोंदिया जिल्ह्यात 35 रुग्णांची नोंद झाली असून 4 रुग्ण दगावले आहे. वर्ध्यात नागपूर नंतर सर्वाधिक 81 रुग्ण मिळाले असून 1 रुग्ण दगावला आहे.

औषधीचा तुटवडा कायम -

नागपूर जिल्ह्यासह सर्वत्र म्यूकरमायकोसिसचा तुटवडा निर्माण झाला आहे. वर्ध्यातील आणि नागपुरच्या कंपनीला एम्फोटेरेसिन बी औषधी निर्माण करण्याची परवानगी मिळाली आहे. कच्चा माल उपलब्ध होताच मास प्रोडक्शन तयार होणार आहे. यात वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेसचे प्रोडक्शन या आठवड्यात उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली कामात आहे.

विदर्भात किती रुग्णांवर पार पडली शस्त्रक्रिया -

म्यूकरमायकोसिस हा आजार एकदा झाल्यानंतर त्यावर शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरकडून सांगितले जाते. यामध्ये नागपूर जिल्ह्यात 839 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहे. तर 489 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तेच 531 जणांना सुट्टी झाली आहे. आतापर्यंत 907 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहे. 629 जण उपचार घेत असून 566 जण उपचार घेऊन घरी गेले आहेत.

हेही वाचा - 16 वर्षीय मुलीला लसीकरणासाठी अमेरिकेत जाऊ देण्याच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.