नागपूर - नागपुरात पालकमंत्री नितीन राऊत हरवल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली. ही तक्रार मनसेकडून करण्यात आली असून कोरोनाची परिस्थिती बिकट होत असताना पालकमंत्री नागपुरात नसल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. तामिळनाडु येथील निवडणुकीच्या प्रचारात हरवलेल्या पालकमंत्र्यांना शोधून आणण्याच्या मागणी केली आहे. विशेष म्हणजे शहरातील कोतवाली पोलिसात तक्रार दिली आहे.
नागपुरात कोरोनाचे संकट गंभीर होत असतान पालकमंत्री मात्र शहरात दिसत नसल्याने ही तक्रार केल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. नागपुरात गेल्या काही दिवसांत कोरोनाबधित रुग्ण वाढत आहे. शुक्रवारी (दि. 26 मार्च) हा आकडा चार हजारांच्या पुढे गेला. शनिवारी (दि. 27 मार्च) जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत 54 आहे. रुग्णासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने धावाधाव करावी लागत आहे.
जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. अशावेळी प्रशासानासोबत बसून उपाययोजना करणे व त्या राबवून घेण्याऐवजी
पालकमंत्री नागपूरकर जनतेला वार्यावर सोडून तामिळनाडूत निवडणुकीचा प्रचारात व्यस्त असल्याचा आरोप मनसेचे शहर सचिव घनश्याम निखाडे यांनी केला आहे.
भाजपाच्या वतीने मंत्र्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप
उपराजधानी नागपुरात बिकट परिस्थिती उदभवत असतांना कोरोनाचे रुग्ण खाटा मिळत नसल्याने भटकंती करत आहेत. रुग्णांचा मृत्यू होत आहे. नागपुरातील गंभीर परिस्थितीला राज्यसरकार जवाबदार असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपूर जिल्ह्यातील राज्यात तीन मंत्री असून कोणाचेच लक्ष नसल्याचेही बावनकुळे म्हणालेत.
हेही वाचा - धुलीवंदनाच्या दिवशी नागपूर शहरात असणार कडेकोट बंद, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई - पोलीस आयुक्त