नागपूर - कोरोनाने अनेक घरात कर्त्या पुरुषांचा जीव गेला. तरुणपणात अनेकजणी विधवा झाल्याचे भयाण वास्तव पुढे येत आहे. या कुटुंबांना कोणचाही आधार नसून जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी काही कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले आहे. ही परिस्थिती काही एका शहराची नाही. यामुळे अश्या पद्धतीने योजना राज्यभर राबवावी अशी मागणी पारवे यांनी केली आहे. याबाबत पारवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.
पालकत्व मोहीम संपूर्ण राज्याभर राबविणे आवश्यक
घराचा आधार कोरोनाने हिरावल्याने काही कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कोणाचा मुलगा, कोणाचा पती, तर चिमुकल्यांचा डोक्यावरून वडिलांचे छत्र हिरावले आहे. उमरेड विधानसभा क्षेत्रात राबवलेली पालकत्व मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याची गरज असल्याचे पत्र मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाच्या माहामारीने निर्माण झाले. या गरीब लोकांना संकटातून बाहेर काढण्याकरिता मदतीचा हात देण्याकरिता मुख्यमंत्री म्हणून आपणाकडून अपेक्षा असल्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे ही पालकत्व मोहीम संपूर्ण राज्याभर राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार राजू पारवे यांनी केली आहे.