नागपूर - ओबीसींच्या प्रकरणावर आज सुनावणी होणार होती. ( Hearing on OBC Reservation ) मात्र निवडणूक आयोगाने अर्ज केल्याने ही सुनावणी 2 मार्चला होणार आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. ( Supreme Court on OBC's Political Reservation ) यात निवडणूक आयोगाच्या अर्जात त्यांनी काही मागणी केली का? हे अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, आणखी काही कागदपत्रांची मागणी केल्यास त्याची पूर्तता राज्य सरकार करेल. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निकाल लवकरात लवकर लागावा, अशीच महाराष्ट्र सरकारची भूमिका आणि प्रयत्न असणार आहे, असे मत इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. ( Minister Vijay Wadettiwar on OBC Reservation )
युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी ग्रामीण केंद्र सरकारच्या संपर्कात आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी आहे, याची माहिती आम्ही गोळा केलेली आहे. तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांचे मात्र हाल होत आहे. केवळ दोन विमान पाठवून काही सर्व विद्यार्थी आले असे नाही. तिथे अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणण्यासाठी युद्धपातळीवर काम झाले पाहिजे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. युद्धामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. मात्र, ऑपरेशन गंगा वाहून जाऊ नये म्हणजे झाले. युक्रेन रशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना इतर देशांनी आपल्या देशातील लोकांना 15 दिवसांपूर्वी त्या देशातुन परत काढण्याचे काम सुरू केले होते. मात्र, भारताने तशा पद्धतीचे कुठलेच पाऊल उचलले नाही, अशी टीकाही मंत्री वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर केली.
राज्यपालांच्या वक्तव्याने महाराज प्रेमी दुखावले -
छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू होते. शिवाजी राजांचे आई वडील हेही गुरू होते. ते स्वयंप्रकाशित होते. समर्थ रामदास स्वामींचे मार्गदर्शन मिळाले नसते तर शिवाजी महारात घडले नसते, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे ज्ञान कदाचित हिमालयात असलेल्या व्यक्तिप्रमाणे असेल. राज्यपाल यांच्या वक्तव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी यांचे मन दुखावले गेले, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा - Agitation OF Sambhaji Raje : छत्रपती संभाजी राजेंना चर्चेसाठी निमंत्रण; शिष्टमंडळ 'वर्षा'वर दाखल
लोक महाज्योतीला बदनाम करण्याचे प्रयत्न -
औरंगाबाद येथे वडेट्टीवार यांच्या कार्यक्रमात महाज्योतीच्या मागणीसाठी काहींनी घोषणाबाजी केली. त्यांचे माथे भडकवण्यात आले होते. मी पोलिसांना सांगितले त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू नये. बार्टीच्या तुलनेने महाज्योतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा देण्याचा मानस आहे. बार्टीमध्ये जिथे 200 विद्यार्थ्यांसाठी संधी मिळते तेवढ्याच निधीत महाज्योतीमध्ये 700 विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे काम करत आहे. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक महाज्योतीला बदनाम करण्याचे काम करत आहे, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.