ETV Bharat / state

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी एकत्र प्रयत्नांची गरज - उदय सामंतांचं नागपुरात प्रतिपादन

आपल्या मातृभाषा मराठीसाठी आपण सर्वांनी राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवले पाहिजे असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी 2012-13 पासून प्रस्ताव केंद्रात पाठवला पण पण काहीच झाले नाही. यामुळे सेनेचे खासदार कृपाल तुमाने आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार विकास महात्मे या दोघांनीही प्रयत्न करावे असे आवाहन केले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Aug 29, 2021, 9:15 AM IST

नागपूर - आपल्या मातृभाषा मराठीसाठी आपण सर्वांनी राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवले पाहिजे असे आवाहन राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी 2012-13 पासून प्रस्ताव केंद्रात पाठवला पण पण काहीच झाले नाही. यामुळे सेनेचे खासदार कृपाल तुमाने आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार विकास महात्मे या दोघांनीही प्रयत्न करावे असे आवाहन या निमित्ताने केले. उच्च शिक्षण विभाग तसेच कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ . विकास महात्मे , कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, अभिजित वंजारी यांच्यासह कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, उज्जैनच्या महर्षि पाणिनि संस्कृत व वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजयकुमार उपस्थित होते.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी एकत्र प्रयत्नांची गरज

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची भावनिक हाक आहे. मराठी 1200 ते 1500 वर्षाचा इतिहास आहे. शेजारच्या राज्यातील भाषेला दर्जा मिळू शकते तर मग महाराष्ट्राला का नाही यासाठी हा मुदा केंद्रात उचलावा. यासाठी पक्षीय भेद दूर ठेवावे असे संस्कृत साधना पुरस्कार कार्यक्रमच्या निमित्याने संकल्प घेऊन केंद्र सरकारला विचरणा केली पाहिजे असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले. यावेळी त्यांनी राज्यात मंत्री असताना हा प्रस्ताव मराठीत केंद्राला पाठवला होता. तत्कालीन केंद्रीय सचिवानी हा प्रस्ताव पाठवावा असे आवाहन केले. तो पाठवून आज आठ ते नऊ वर्ष लोटले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. ही भाषा मोजक्याच लोकांपुरतीच मर्यादित न राहता सर्वसामान्यांची भाषा व्हावी. केवळ रामटेक पुरतेच मर्यादित राहू नये यासाठी रत्नागिरीसह पुणे, परभणी तसेच जळगाव येथे केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. संस्कृत साधना पुरस्काराची परंपरा यापुढे अखंडितपणे सुरु राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने सन्मानित सर्व सत्कारमूर्तींनी संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे सामाजिक कार्य यापुढेही अविरतपणे सुरु ठेवावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रामटेक येथे केले. संस्कृत भाषा केवळ शिकून उपयोग नाही तर ती बोलता यावी व दैनंदिन व्यवहारात तिचा उपयोग व्हावा, यासाठी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने विद्यापीठ स्तरावर ‘संस्कृत भाषा वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल.
या सोहळ्यामध्ये सन 2015 ते 2020 या कालावधीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी 48 सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र तसेच रोख 25 हजार रुपयांची रक्कम प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण सहा गटात झाले आहे. त्यामध्ये प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक व इतर, संस्कृत प्राध्यापक व तत्सम अध्यापक, संस्कृत कार्यकर्ता तसेच अन्य राज्यातील संस्कृत पंडितांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी नागपूरच्या वसंतराव नाईक कला आणि समाजविज्ञान संस्था येथे कोविड योद्धा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत होत मुख्यमंत्री उत्तम कामगिरीत हे आता देशात चौथ्या स्थानावर यामुळे त्यांचावर टीका करणारे करत राहतात. ते राज्याचेच नाही तर देशाचे नेतृत्व करू शकतात. यामुळे भाजपचे लोकांच्या पोटात पोटसुळ उठल्याने दुखत असतात अशीही टीका केली. भाजपने 75 हजार पत्र मुख्यमंत्री याना पाठवणार यावर बोलताना म्हणाले आम्हाला 7लाख 50 हजार पाठवी लागले. केंद्रीय मंत्री राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारली आहे. तसेच मराठी भाषेचे विद्यपीठ होण्याची मागणी होती ती सुद्धा माहाविकास आघाडी सरकार लवकर पूर्णत्वास नेईल असे बोलून दाखवले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.