मुंबई - वेठबिगारीमध्ये अडकलेल्या ( Rescue And Rehabilitation Of 24 Serfdom Child ) 24 मुलांची सुटका करून त्यांना पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्यासह त्यांचे आश्रम शाळेत ( Ashram School ) पुनर्वसन करण्यात येत असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे ( Minister Suresh Khade Information On Serfdom Child) यांनी आज विधानसभेत दिली. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ ( NCP Leader Chhagan Bhujbal ) यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
केवळ दोन हजार रुपये आणि मेंढ्यांच्या बदल्यात मुलांना वेठबिगारीस ( Rescue And Rehabilitation Of 24 Serfdom Child ) ठेवल्याचा धक्कादायक प्रकार राज्यातील काही भागात घडला आहे. ही बाब देशाला आणि राज्याला मान खाली घालणारी असून आदिवासींच्या उत्थानासाठी उपाययोजना या सरकारला कराव्या लागतील, असे मत राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे सभागृहात मांडले. नाशिक जिल्ह्यासह, अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाच्या बालमजुरांना वेठबिगारीस ठेवल्याबाबत व यातील एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याबाबत भुजबळ यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली होती.
24 मुले वेठबिगारीत कातकरी समाजाच्या गरीबी आणि अज्ञानाचा फायदा घेवून नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाच्या अनेक बालमजुरांना वेठबिगारीस ( Rescue And Rehabilitation Of 24 Serfdom Child ) ठेवल्याच्या घटना सप्टेंबर २०२२ मध्ये निदर्शनास आल्या आहे. सप्टेंबर २०२२ च्या पहिल्या सप्ताहात व त्या सुमारास उभाडे (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील आदिवासी पाड्यावरील १० वर्षाच्या मुलीचा वेठबिगारीमुळे मृत्यू ( Serfdom Girl Died In Nashik ) झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याचे सभागृहाच्या निदर्शनास त्यांनी आणून दिले.
बेपत्ता मुलांचा शोध घेण्यास टाळाटाळ अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यातील सहा बालकांना एक मेंढी व दोन हजार रुपयात विकत घेवून त्यांच्यावर अत्याचार करत मजुरी करून घेतली. सदर वेठबिगारी ( Rescue And Rehabilitation Of Serfdom Child ) प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र बेपत्ता मुलांचा आणि फरार आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून दिरंगाई व टाळाटाळ केली जात असल्याचे छगन भुजबळ ( NCP Leader Chhagan Bhujbal ) म्हणाले.
सरकार कारवाई करणार आहे का ? नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात १८ पेक्षा अधिक मुलांची वेठबिगार ( Rescue And Rehabilitation Of 24 Serfdom Child ) म्हणून त्यांच्याच पालकांकडून विक्री झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या समाजाला आपण थेट मदत मिळावी, यासाठी कार्यवाही करणार आहोत की नाही, अशी भूमिकाही छगन भुजबळ यांनी मांडली. महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाला थेट निधी मिळतो. त्याला वित्त विभागाच्या परवानगीची गरज नसते. मग असे असताना राज्य सरकारच्या योजना या त्या बांधवांपर्यंत का पोहोचत नाहीत, असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
मुलांचे पुनर्वसन झाले - सुरेश खाडे यावेळी उत्तरात मंत्री सुरेश खाडे ( Minister Suresh Khade Information On Serfdom Child) यांनी आदिवासी कातकरी समाजातील वेठबिगारीचा प्रश्न आणि त्यात मुलीचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याबाबत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. शासनाच्यावतीने पुनर्वसन करण्याच्या उपाययोजना करण्यात येत असून वेठबिगारीत ( Minister Suresh Khade Information On Serfdom Child) अडकलेल्या एकूण २४ मुलांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत तसेच त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत शासनाच्यावतीने देण्यात आली. केंद्र शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. तसेच याबाबत आवश्यक ते उपक्रम तातडीने राबविले जातील. आदिवासी समाजाच्या विविध मूलभूत प्रश्नासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल, असे खाडे यांनी स्पष्ट केले.