नागपूर - महिला व बालकल्याण मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना चार पत्रे लिहिली आहेत. राज्यातील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही पत्रे लिहिण्यात आली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील साहित्य प्रकाशन समिती बरखास्त करून समितीची पुनर्ररचना करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. संपूर्ण राज्यासह नागपूर आणि विदर्भातील विमान प्रवाशांसाठी शिवशाहीप्रमाणे बससेवा सुरू करण्याची मागणी देखील या पत्रात केली आहे.
हेही वाचा - सिंचन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घुमजाव
ऊसतोड महिला कामगारांबाबतही मुख्यमंत्र्यांना या पत्रातून अवगत केले आहे. मराठवाड्यातील ऊसतोड महिला कामगार ६ महिन्यांसाठी शेतीच्या परिसरात वास्तव्यास असतात. मासिक पाळीच्या काळात त्या कामावर जाऊ शकत नाहीत. कर्ज वाढू नये, पगार कपात होऊ नये, रोजगार बुडू नये म्हणून मासिक पाळीवर तोडगा म्हणून या महिलांनी गर्भाशय काढले आहेत. अशा महिलांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात याव्यात, असे निवेदन या पत्रातून करण्यात आले आहे.