नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नुकतेच कोरोनामुक्त झाले असून त्यांनी स्वतः ट्विटरव्दारे आज(बुधवार) ही माहीती दिली आहे. काही दिवसापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी करून घेत स्वतःला होम आयसोलेट केले होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या चाहत्यांचे व शुभचिंतकांचे आभारही ट्विटच्या माध्यमातून मानले आहे.
-
मुझे आप सभी को यह बताते हुए बहुत प्रसन्नता हो रही है कि आप सभी के आशीर्वाद और शुभकामनाओं के बल पर मैं कोरोना से ठीक हो चुका हूं। आपके स्नेह के लिए धन्यवाद।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मुझे आप सभी को यह बताते हुए बहुत प्रसन्नता हो रही है कि आप सभी के आशीर्वाद और शुभकामनाओं के बल पर मैं कोरोना से ठीक हो चुका हूं। आपके स्नेह के लिए धन्यवाद।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 30, 2020मुझे आप सभी को यह बताते हुए बहुत प्रसन्नता हो रही है कि आप सभी के आशीर्वाद और शुभकामनाओं के बल पर मैं कोरोना से ठीक हो चुका हूं। आपके स्नेह के लिए धन्यवाद।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 30, 2020
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता सर्वसामान्यांप्रमाणे अनेक राजकीय नेतेमंडळींना देखील कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र आहे. अनेक नेते मंडळी यावर यशस्वीरित्या मात करत असल्याचे पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांनी कोरोनामुक्त झाल्याची माहिती स्वतः ट्विटरवरून दिली आहे. शिवाय ट्विटमध्ये त्यांनी सर्वांचे आभारही मानले आहेत.
गडकरी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतःला होम आयसोलेट केले होते. शिवाय वेळोवेळी ते डॉक्टरांचे सल्लेही घेत होते. त्यांना कोरोनाची कोणतीही खास लक्षणे नव्हती. मात्र, चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते होम आयसोलेट झाले होते. परंतु आता मात्र त्यांनी कोरोनावर मात करत आपल्या शुभचिंतकांचे आभार मानले आहे.