नागपूर - जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात दारूची विक्री करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. दारू विक्रीला सुरुवात होताच तळीरामांनी दारू खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले. पहिल्याच दिवशी राज्याच्या उपराजधानीत लाखो लिटर दारूविक्री झाली.
मद्यप्रेमींनी प्रखर उन्हाची तमा न बाळगता दोन महिन्यांनी कसर भरून निघेल इतका दारू साठा विकत घेतला. शहरात ऑनलाइन विक्री आणि परवान्याची अट असल्याने अनेक तळीरामांनी ग्रामीण भाग गाठला. हिंगणा मार्गावर असलेल्या एका वाईन शॉपसमोर दारू विकत घेणाऱ्यांनी सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करत पुढील महिना भर पुरेल इतका दारू साठा विकत घेतला.