ETV Bharat / state

सेना प्रवेशासाठी मिलिंद नार्वेकरांचे तब्बल २५ फोन; वडेट्टीवारांचा नागपुरात गौप्यस्फोट - काँग्रेस

वर्षा बंगल्यावरून फोन आलेला नाही, तर वांद्रे येथून नार्वेकरांनी २५ वेळा फोन केला. तसेच पुढील काळात केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर देखील देऊ केली, असे त्यांनी सांगितले. मात्र, मला पक्ष बदलायचा नाही. त्यामुळे मी फोन आल्याचे सर्वांना सांगितले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

विजय वडेट्टीवार आणि मिलिंद नार्वेकर
author img

By

Published : Aug 2, 2019, 4:44 PM IST

नागपूर - शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मालिंद नार्वेकर यांनी तब्बल २५ फोन केल्याचा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वांद्रे येथून मला वारंवार फोन येत आहेत. मात्र, हे फोन नेमके कोण करत आहे, याचा खुलासा करणार असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले होते. आज त्यांनी नागपुरात पत्रकारपरिषद घेऊन शिवसेनेकडून फोन येत असल्याचे सांगितले.

सेना प्रवेशासाठी मिलिंद नार्वेकरांचे तब्बल २५ फोन; वडेट्टीवारांचा नागपुरात गौप्यस्फोट

भाजपमध्ये सध्या मेगाभरती सुरू आहे. त्यामुळे कोणता नेता कोणत्या पक्षात आहे हे सांगणे सुद्धा कठीण झाले आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या गळाला लागल्यानंतर आता नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देखील पळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झालेले दिसते. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेलेल्या वडेट्टीवारांना पुन्हा शिवसेनेत बोलवण्यासाठी नार्वेकरांनी फोन केले असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.

वर्षा बंगल्यावरून फोन आल्याचा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, वर्षा बंगल्यावरून फोन आलेला नाही, तर वांद्रे येथून नार्वेकरांनी २५ वेळा फोन केला. तसेच पुढील काळात केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर देखील देऊ केली, असे त्यांनी सांगितले. मात्र, मला पक्ष बदलायचा नाही. त्यामुळे मी फोन आल्याचे सर्वांना सांगितले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Intro:विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि शिवसेनेवर आरोपांची सरबत्ती केली आहे...मला देखील शिवसेनेत प्रवेश घ्यावा या करिता मिलिंद नार्वेकरांचे 25 फोन आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.Body:राज्यातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षात सध्या मेगाभर्ती सुरू आहे...विरोधक पळवण्याची स्पर्धा भाजप आणि शिवसेनेत सुरू असल्याने कोणता नेता कोणत्या पक्षात आहे हे सांगणे सुद्धा कठीण झाले आहेत,तर त्या नेत्यांची ताकत असलेले कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात पडलेले आहेत...माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजप च्या गळाला लागल्यानंतर आता नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देखील गोंजारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे...शिवसेनेतुन बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचा पंजा हातात घेणाऱ्या वडेट्टीवार यांनी पुन्हा शिवसेनेत यावे या करिता प्रयत्न सुरू झाले आहेत....मातोश्री वरून मिलिंद नार्वेकरांनी मला किमान 25 वेळा फोन केला सोबतच पुढील कार्यकाळात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याचा गौपयस्फोट विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला... शिवसेनेत परत यावे यासाठी मातोश्री वरून अनेकदा फोन आल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी काल केला होता... शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी अनेकदा फोन केल्याचा दावा वडेट्टीवार यांनी आज नागपूरात केला... सोबतच वर्षा वरून कुठलाही फोन आलेला नाही असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
बाईट - विजय वडेट्टीवार - विरोधी पक्ष नेता
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.