ETV Bharat / state

नियम पाळा, लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका...महापौरांचे नागरिकांना आवाहन

नागपुरात कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा शहरात लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी देखील आयुक्तांनी दिलेला इशारा नागरिकांनी गंभीरपणे घ्यावा, असे आवाहन केले होते.

mayors-appeal-to-citizens-for-follow-rules-at-nagpur
नियम पाळा, लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका.
author img

By

Published : Jul 16, 2020, 12:48 PM IST

नागपूर- शहरात पुन्हा लॉकडाऊन लावायचा की नाही हे पूर्णत: नागरिकांच्या हातात आहे. अजूनही वेळ गेली नाही. नियम पाळले नाही तर नाईलाजास्तव पुन्हा प्रशासनाला लॉकडाऊन घोषित करावा लागेल. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करा, नियम टाळा, लॉकडाऊन पुन्हा लादण्याची वेळ येऊ देऊ नका, असे कळकळीचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा शहरात लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी देखील आयुक्तांनी दिलेला इशारा नागरिकांनी गंभीरपणे घ्यावा, असे आवाहन केले होते. मात्र नागरिक याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने आज नागपुर शहराचे महापौर संदीप जोशी स्वतः रस्त्यावर उतरुन नागरिकांची समजूत काढताना दिसले.

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाने नियम अटींसह लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली. दिशानिर्देश आणि नियमांच्या अधीन राहून दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची मुभा दिली. मात्र, ज्या दिवशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सुरू झाली. याचाच अर्थ नागरिक नियम पाळत नाही, असे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी रस्त्यांवर उतरुन नागरिकांची समजूत काढत आहेत.

शहरात लॉक डाऊन लागू करण्यापूर्वी संदीप जोशी यांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शहराचा संयुक्तिक दौरा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, मुंढे यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने संदीप जोशी यांनी महाल परिसरात जनसंवाद कार्यक्रम राबवला. यावेळी त्यांनी महाल परिसरातील मुख्य बाजारपेठेत फिरुन लोकांकडून आणि दुकान मालकांकडून नियमांची अंमलबजावणी होते आहे की नाही याची पाहणी केली. जोशी यांनी व्यापारी आणि नागरिकांशी कोरोना विषयी आणि लॉकडाऊन विषयी संवाद साधला. मात्र मार्केट मधील गर्दी आणि सोशल डिस्टनशिंग चा उडालेला फज्जा बघता महापौरांनी नाराजी व्यक्त व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.