नागपूर Maratha Protest In Nagpur : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. (Maratha protestors aggressive in Nagpur) तर राज्याच्या इतर भागात देखील आंदोलक उग्र होत तणावाची परिस्थिती वाढत आहे. अशात आता नागपूर येथे सकल मराठा समाजातर्फे महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ (Maratha Protester Hunger Strike in Nagpur) आंदोलनाला सुरुवात केली गेली आहे. आज उपोषणकर्त्यांनी मुंडन आंदोलन करत आपला निषेध नोंदवला.
नागपुरात शांततामय मार्गाने उपोषण : आम्हाला शांततामय पद्धतीनं साखळी उपोषण करायचं असल्याचं मराठा समाज आंदोलकांनी स्पष्ट केलंय. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आता उग्र आणि हिंसक आंदोलन करत आहे. सोमवारी बीडमध्ये आंदोलकांनी आमदाराच्या घराला आग लावत मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. त्या पार्श्वभूमीवर नागपुरात मात्र परिस्थिती अतिशय शांततापूर्ण आहे.
काय म्हणाले राजे मुधोजी भोसले : मराठ्यांमुळेचं देशात महाराष्ट्राची ओळख आहे. मराठ्यांनीचं संपूर्ण महाराष्ट्र घडवला आहे. जर मराठा समाजावर अन्याय आणि अत्याचार होत असतील तर सहन केलं जाणार नाही. त्यामुळे उद्रेक होणं स्वाभाविक असल्याची प्रतिक्रिया राजे मुधोजी भोसले यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो आतापर्यंत सुटायला पाहिजे होता. आधीचं याची योग्य दखल घेतली असती तर आज ही वेळ आली नसती असं ते म्हणाले आहेत. आरक्षण मराठ्यांचा अधिकार आहे. आंदोलन शांतीत व्हावे हा आमचा प्रयत्न आहे. परंतु सरकारनं तत्काळ आरक्षण द्यावं, अशी मागणी नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी केली.
हेही वाचा:
- MLAs Agitation at Mantralaya : मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या गेटला ठोकलं टाळं, आमदारांना नेलं पोलीस स्थानकात!
- Maratha Reservation All Party Meeting: आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं सर्वपक्षीय बैठकीत नाराजी, एकमतानं 'हा' केला ठराव
- Manonj Jaragne Patil News: मराठ्यांना आतापर्यंत सर्वांनी फसवलं, आजपासून पाणीही सोडणार - मनोज जरांगे