नागपूर - भारतरत्न फक्त सावरकरांनाच का, गोडसेला का नको? असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी उपस्थित केला आहे. गांधी वधाच्या प्रकरणात सावरकर हे फक्त आरोपीच होते. गोडसे तर गांधी वधासाठी दोषी ठरला होता, त्यामुळे त्यालाही भारत रत्न द्या असा उपरोधिक टोला तिवारींनी भाजपला लगावला आहे. भाजपकडून त्यांच्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या आश्वासनाबद्दल काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी हे उत्तर दिले आहे. त्यामुळे, काँग्रेस सावरकर आणि गोडसे यांना एक सारखेच मानत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जर महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या वर्षात सरकारला कोणाला सन्मानित करायचेच असेल आणि तो महात्मा गांधी यांच्या हत्येत सहभागी असेल तर आम्ही काय करणार? असे मनीष तिवारी म्हणाले. या प्रकरणी कपूर कमिशनच्या चौकशीत धक्कादायक तथ्य समोर आले होते की, सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महात्मा गांधी यांच्या हत्येची माहिती आधीच होती, असे असताना सावरकर यांना सम्मानित करताना सरकारने विचार करायला हवा, असेही तिवारी म्हणाले.
हेही वाचा - मार्केटिंगमध्ये अव्वल असलेल्या सरकारला जनतेच्या समस्यांचे घेणे-देणे नाही - मल्लिकार्जुन खरगे
दरम्यान, महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले हे १९४७ च्या आधीच्या काळातील महापुरुष होते. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वीच्या नेत्यांना पुरस्कार देणे योग्य आहे की, अयोग्य या प्रश्नावर? तिवारी यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. मात्र, निश्चितच भारतरत्न सारखे पुरस्कार देताना नक्कीच एक काळमर्यादा ठरविली पाहिजे, असे तिवारी म्हणाले.
हेही वाचा - सावरकरांना भारतरत्न देण्याच्या भाजपच्या धोरणाला उदित रांज यांचा विरोध