नागपूर - आतापर्यंत जे निकाल पुढे येत आहे, त्यामध्ये महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत 86 ग्रामपंचायतचे निकाल पुढे आले आहे. यात 50 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडताना दिसत आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यात भाजपला फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रत्येक कार्यकर्त्याने अहोरात्र काम केले -
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. वर्षभराच्या काळात जिल्हा परिषद पंचायती समिती, नगर पंचायतमध्ये महाविकास आघाडीला यश मिळताना दिसून येत आहे. या एकजुटीने नुकतेच पदवीधर मतदार संघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपची एवढे वर्ष अललेली सत्ता मोडीत काढली आहे. त्याचप्रमाणे या ग्रामपंचायत निवडणुकीतही ग्रामीण भागात जाऊन प्रत्येकाने अहोरात्र काम केले आहे. त्याचेच हे यश आहे. सध्या जे निकाल पुढे येत आहे, त्यात 90 टक्के जागांवर काँग्रेस निवडणून येतील, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी दिली आहे.
काही ग्रामपंचायतीचे निकाल येणे बाकी -
दरम्यान, शिवसेनेला नरखेड तालुक्यात मदना, पारशिवणीला सुवरधारा, रामटेक आणि मौदामध्ये मानापूर आणि पथरी या ठिकाणी यश मिळाले आहे. तर अजून काही ग्रामपंचायतीचे निकाल येणे बाकी आहे.
हेही वाचा - शिरूर तालुक्यात 30 वर्षीय तरुणावर गोळीबार; तरुणाचा मृत्यू