ETV Bharat / state

FDI In Maharashtra : थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, गुजरात आणि कर्नाटकला टाकले मागे - महाराष्ट्रात 29 टक्के परकीय गुंतवणूक

देशात थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 29 टक्के परकीय गुंतवणूक आली आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jun 5, 2023, 10:07 PM IST

नागपूर : थेट परकीय गुंतवणूक (FDI) आकर्षित करण्यात कर्नाटक आणि गुजरातला मागे टाकत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

  • Maharashtra is Number 1 Again, in FDI !
    We were continuously telling that since now the corrupt, blackmailer, extortionist MVA Govt is uprooted and our Govt is back, the flow of investment in Maharashtra will increase and we will be Number 1 Again.
    And here we go - the DIPP Jan… pic.twitter.com/IeywipLwHK

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्रात 29 टक्के परकीय गुंतवणूक : 'मला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, महाराष्ट्र सर्वाधिक एफडीआय आकर्षित करणारे राज्य बनले आहे,' असे ते सोमवारी म्हणाले. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, 'डीआयपीपी अहवाल सार्वजनिक करण्यात आला असून, महाराष्ट्रात सर्वाधिक 29 टक्के एफडीआय आले आहे. त्या तुलनेत कर्नाटकात 24 टक्के आणि गुजरातमध्ये 17 टक्के एफडीआय आले आहे.'

'आघाडीच्या काळात राज्याची प्रतिमा मलिन झाली' : नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, 'देशांतर्गत आणि थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत आम्ही महाराष्ट्राच्या नेतृत्व क्षमतेबद्दल नेहमीच आशावादी होतो. दुर्दैवाने, महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात, गुंतवणूकदारांमध्ये विश्वास नसल्यामुळे राज्य मागे पडले होते. त्यावेळी नेतृत्वाचा अभाव होता. महाविकास आघाडीत भ्रष्टाचार आणि ब्लॅकमेलिंगमुळे देश आणि परदेशातील गुंतवणूकदारांमध्ये राज्याची प्रतिमा मलिन झाली होती'

'महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण' : ते पुढे म्हणाले की, '30 जून रोजी आमचे सरकार स्थापन झाल्यापासून मी महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्याचे आश्वासन दिले होते. आमच्या सुसाशनामुळे राज्यात अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे जे कोणत्याही राज्यातील गुंतवणुकीसाठी अविभाज्य आहे. गुंतवणुकीसाठी राज्या-राज्यांमधील स्पर्धेला पाठिंबा देत फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण होते आणि राहील.

वेदांत - फॉक्सकॉन वरून विरोधकांची टीका : डीआयपीपीच्या अहवालामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला असला, तरी शिंदे - फडणवीस युतीविरोधात विरोधकांनी आपला जोर कमी केलेला नाही. 1.50 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आश्वासन देणारा वेदांत - फॉक्सकॉन प्रकल्प भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या इशार्‍यावर जबरदस्तीने गुजरातला कसा हलवण्यात आला, अशी टीका महाविकास आघाडीचे नेते सरकारवर सातत्याने करत आहेत.

हे ही वाचा :

  1. Maharashtra Cabinet Expansion : मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार? फडणवीसांनी थेटच सांगितले....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.