ETV Bharat / state

Devendra Fadnavis : कायदा व सुव्यवस्था असणारे शहर ही नागपूरची नवीन ओळख - देवेंद्र फडणवीस

author img

By

Published : May 13, 2023, 10:08 AM IST

नागपूर शहरातील लकडगंज येथील आधुनिक सर्व सोयीसुविधायुक्त पोलीस स्टेशन,पोलीस उपायुक्त कार्यालय तसेच ३४८पोलीस निवासी सदनिका असलेल्या निवासी संकुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी देवेंद्र फडणवीस भाषणाद्वारे सांगितले की, पोलीस दलात सुरू असलेल्या आधुनिकीकरणामुळे गुणात्मक परिवर्तन झाले आहे.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : नागपूर शहरातील लकडगंज येथील आधुनिक सर्व सोयीसुविधायुक्त पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त कार्यालय तसेच ३४८ पोलीस निवासी सदनिका असलेल्या निवासी संकुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थिती होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणाद्वारे काही मुद्दे उपस्थित करून त्यांनी नागपूरमध्ये पोलिस कार्यालयचे आणि प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, पोलीस 12 ते 24 तास ड्युटी करतात त्यांची राहण्याची चांगली व्यवस्था पाहिजे. पोलीस क्वार्टरमध्ये चांगल्या सुविधा पाहिजे, 2014 नंतर पोलीस हाऊसिंगची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली. पोलीस हाऊसिंग चांगले काम करत आहे. पण वेग कमी आहे, पोलीस हाऊसिंगमध्ये काही झारीचे शुक्राचार्य आहेत जे अतिशय वेळ लावतात. त्यामुळे प्रकल्पाचे महत्व कमी होते. कामाचा स्पीड वाढवला पाहिजे टेंडर काढण्यासाठी वर्ष लागू नये. आपल्याला एक लाख सेवानिवास तयार करायचे आहे. नागपूर पोलीस आयुक्तालय कार्यालयाची इमारत अतिशय चांगली आहे. अनेक राज्यांच्या महासंचालक कार्यालयापेक्षा पोलीस आयुक्त कार्यालय चांगली आहे.यानंतर त्यांनी म्हटले की, पोलीसांसाठी निवास संकुल बांधण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून राज्यात 1 लाख सेवानिवास बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नवीन पोलीस स्टेशनच्या बांधकामासोबत निवास संकुल बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पोलीस गृहनिर्माण विभागाने बांधकामामध्ये होत असलेला विलंब टाळुन सर्व सुविधायुक्त सेवानिवास प्रकल्पाला गती द्यावी अशी सूचना यावेळी त्यांनी केली.

हक्काचा निवारा मिळावा यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध: नागपूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवीन पोलीस स्टेशनसाठी प्रस्ताव तयार करावा. त्यानुसार यासाठी मंजुरी देता येईल. पोलीसांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. ही सुविधा सुरु राहावी यासाठी बँक ऑफ इंडिया सोबत करार करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पोलिसांच्या आरोग्य तपासणीसाठी डिजिटल हेल्थ फाईल तयार करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शहरातील अपघात प्रवण स्थळांचा शोध घ्यावा: नागपूर शहर अपघातमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सुचना करतांना शहरातील अपघात व मृत्युचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अपघात प्रवण स्थळांचा शोध घ्यावा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेमध्ये झालेल्या बदलामुळे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. पोलीस दलाने गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई करावी. पुर्व नागपूर येथे शैक्षणिक तसेच पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प सुरु झाले असून नागपूर स्मार्ट सिटीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. लकडगंज येथे देशातील स्मार्ट पोलीस स्टेशन व निवासी संकुलातील बांधकाम पूर्ण झाले असून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल पोलीस तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

नागपूर शांत शहर: गेल्या वेळेस व आता देखील मी गृहमंत्री असल्याने एखाद्या घटनेला जास्त प्रसिद्धी मिळते, गृहमंत्र्यांच्या शहरात काय चाललंय अस म्हणण्यात येत,पण नागपूर हे शांत असे शहर आहे, इथे सामान्य माणसाला त्रास होत नाही,व्यवसाय किंवा उद्योगांना त्रास होत,नाही ज्यामुळे जे लोक नागपूर शहराला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी सांगू इच्छितो की हे एक चांगले शहर आहे. नवे सरकार आल्यावर पुन्हा एकदा विकासाला चालना मिळाली आहे, नितीन गडकरींनी विकास हळू नाही होऊ दिला मात्र महाराष्ट्र सरकारचे जे दुसरे इंजिन होते ते अडीच वर्षे धक्के खात बंद होतं, आता सुप्रीम कोर्टानेही आमच्या सरकारवर शिक्कामोर्तब केले आहे अस उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Shivsena criticizes BJP : चोर आणि लफंगे हीच सत्तेची गुरुकिल्ली, सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा समाचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.