नागपूर - डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर नागपुरात निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात 5 ते 12 जुलै या सात दिवसात शिथिल ऐवजी काही नियम कडक केलेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा या आठवभर आणि इतर विना अत्याशक सेवा यात पाच दिवस 4 वाजेपर्यंत सुरू असणारा आहे. यात पुढील आठवड्यात सायंकाळच्या खेळणावर बंदी यासोबत हॉटेलेमधून पार्सल देण्यास बंदी घालण्यात आली असुन हॉटेलला घरपोच सेवा देण्यास मुभा देण्यात आली आहे.
नागपूर शहरात यामध्ये मध्यंतरी काही संशयित रुग्ण मिळून आले होते. यात त्यांचे अहवाल कोरोना डेल्टा नवीन व्हेरिएंट निगेटिव्ह आल्याने डेल्टा प्लसचे संकट टळले आहे. पण तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने कोरोनाच्या नवीन बधितांची रुग्णसंख्या कमी असतांना नियमात शिथिलता मात्र देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवा आठवड्यातील सातही दिवस 4 पर्यंत खुले असणार आहे. यात बिगर अत्यावश्यक सेवा मात्र या सोमवार ते शुक्रवार असणार आहे. शनिवार रविवार अत्यावश्यक वगळता मागील आठवड्या प्रमाणे पूर्णतः बंद असणार आहे. यात शाळा महाविद्यालय बंद असून ऑनलाइन अभ्यासक्रमा सुरु करण्यात आले आहे. यासोबत मॉल थेटर बंद असणार आहे. यात नव्याने यामध्ये हॉटेल रेस्टॉरंट हे चार पर्यंत सुरू असून रात्री 10 पर्यंत पार्सल सुविधा सुरु होती. यात बदल करत पार्सलची वेळ चार पर्यंत असणार आहे. पण हॉटेल रेस्टॉरंट यांना घरपोच सुविधा देण्यास मुभा दिली आहे. यात मैदानावर खेळयाण्यासाठी सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी सुद्धा मुभा देण्यात आली होती. पण या आठवड्यात सायंकाळच्या खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सलून जिम ब्युटी पार्लर दुपारी चार वाजेपर्यंत 50 क्षमतेने सुरू राहतील, पण यामध्ये एसी नसावा अशी अट घालण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी पूर्व वेळ घेऊन जावे असे सूचित करण्यात आले. यात खरिपाच्या हंगाम सुरू झाला असून कृषी सेवा केंद्र चार वाजेपर्यंत आठवडाभर सुरू राहील. यात सार्वजनिक बस सेवा 100% क्षमतेने पण उभे नसलेले प्रवासी नेण्यास बंदी असणार आहे. धार्मिक स्थळे स्विमिंग पूल बंद असतील. लग्नसमारंभासाठी पन्नास लोकांची उपस्थिती कायम असेल तसेच अंतिम संस्कारला वीस लोकांच उपस्थित राहण्यासाठी परवानगी असणार आहे. पण हे कार्यक्रम 3 तासापेक्षा जास्त नसावे अशी अट देण्यात आली आहे. खाजगी कोचिंग क्लासेस बंद असून ऑनलाईन अभ्यासक्रमांना मात्र मुभा राहील ग्रंथालय अभ्यासिका चार पर्यंत सुरू राहतील.