ETV Bharat / state

Little Girl Locked In House : चिमुकलीला घरात कोंडून ठेवणाऱ्या दाम्पत्यापैकी एकाला नागपूर विमानतळावरून अटक - Little Girl Locked In House

Little Girl Locked In House : आठ ते दहा वय असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात कोंडून एक निर्दयी दाम्पत्य ८ दिवसांपूर्वी बंगलोरला गेले. ही धक्कादायक बातमी काल नागपुरात उजेडात आल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी मुख्य आरोपीला नागपूरच्या विमानतळावरून अटक केली आहे (One member arrested from Nagpur airport). तहा अरमान इशतीयाक अहमद खान असं या आरोपीचं नाव आहे.

Little Girl Locked In House
आरोपीस अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 4:22 PM IST

लहान मुलीला घरात कोंडल्या प्रकरणावर पोलिसांची प्रतिक्रिया

नागपूर Little Girl Locked In House : अटकेतील आरोपीची पत्नी हिना आणि मेहुणा अजहर नारद्दीन शेख अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या प्रकरणातील आरोपी तहा अरमान इशतीयाक अहमद खानचा मेहुणा अजहर नारद्दीन शेखवर पीडित मुलीने अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

७ दिवस छोट्या बाथरूममध्ये कैद : सुमारे 8 दिवसांपूर्वी आरोपी तहा अरमान इशतीयाक अहमद खानसह कुटुंब बंगलोरला गेलेले होते. घराबाहेर पडताना त्यांनी घर कामासाठी आणलेल्या चिमुकलीला दोन बाय दोनच्या बाथरूममध्ये कोंडले होते. दरम्यान ३० ऑगस्टला वीज बिल भरले नाही म्हणून त्यांची वीज कापण्यात आली होती. ६ ते ७ दिवस ती त्या छोट्या बाथरूममध्ये कैद होती. परंतु ज्यावेळी वीज कापली गेली तेव्हा अंधारामुळे ती घाबरली आणि ती बाथरूमची खिडकी तोडून बाहेर पडली. त्यानंतर ती अनेक तास घराबाहेर बसलेली असल्याने शेजारच्या काही लोकांना संशय आला. त्यांनी मुलीची आस्थेने विचारपूस केली असता ही अमानवीय घटना उजेडात आली.

आरोपींकडून मुलीवर अत्याचार : ज्यावेळी पीडित मुलीने तिच्या सोबत घडलेली सर्व आपबीती सांगितली तेव्हा तिथे उपस्थित पोलिसांसह प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. सर्व आरोपींनी पीडित मुलीवर शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे. आरोपींनी तिच्या शरीरावर सिगारेट आणि अन्य लोखंडी वस्तू गरम करून चटके देखील दिल्याची बाब आज तपासात उघड झाली आहे. आरोपी मुलीला रोज बाथरूममध्ये कोंडून ठेवायचे. तिला कधी तरी शिळे अन्न खायला देत असे. "तुझे हमने खरीद के लाये है, तेरे साथ हम जैसा चाहे वैसा सलूख कर सकते है. हमारे जुल्म सहेगी तो ही तुझे जन्नत नसीब होगी" अशा प्रकारची तिला शिकवण देत होती. त्यामुळे मुलगी मुकाट्याने सर्व अत्याचार सहन करत होती. ही बाब देखील तपासात उघड झाली आहे.

पीडिता बंगलोरच्या चौकीदाराची मुलगी : ज्या मुलीवर अनन्वित अत्याचार केले ती मुलगी बंगलोरची असल्याची बाब देखील तपासात उघड झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीची पत्नी हिनाच्या माहेरी असलेल्या चौकीदाराची मुलगी आहे. चौकीदाराला ७ अपत्य आल्याने हिनाने पीडितेला मदतीसाठी नागपूरला आणले होते. पीडितेला योग्य शिक्षण देऊ हे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा तिला नागपूरला आल्यानंतर तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी सुरू केला तपास : पीडित मुलीचे वय किती या संदर्भात अद्यापही खुलासा होऊ शकलेला नाही. तिला देखील या बाबतीत माहिती नाही. पीडिता ही आठ ते दहा वर्षांची असल्याचा अंदाज आहे. पीडितेची काल वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचा सविस्तर अहवाल आज पोलिसांना प्राप्त होईल असा अंदाज आहे. हुडकेश्वर पोलिसांनी काल पीडित मुलीने कथन केलेल्या घटनाक्रमानुसार आरोपींच्या विरोधात पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:

  1. Girl Child Rescue Nagpur : नागपुरात आठ वर्षीय चिमुकलीला कोंडून दाम्पत्य बंगलोरला; मुलीची सहा दिवसांनंतर सुटका
  2. BJP Women Officer Murder : भाजपा महिला पदाधिकाऱ्याच्या हत्ये प्रकरणी माहिती देणाऱ्याला नागपूर पोलीस देणार एक लाखांचे बक्षीस
  3. Theft In Nagpur : वडिलांनी अँब्युलन्समधून पोचवला मृतदेह तर मुलानं केली त्याच घरात चोरी, वाचा बाप-लेकाचं भन्नाट चोरीचं प्लॅनिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.