नागपूर - महापोर्टलमध्ये सुधारणा करु नका, तर रद्दच करा, अशी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मागणी आहे. महापोर्टल घोटाळा हा व्यापमपेक्षाही मोठा घोटाळा आहे, असे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महापोर्टल रद्द करण्याची मागणी केली. नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन जोरदार वाद झाला. आतापर्यंत दोनवेळा विधानसभेचे कामकाज थांबवण्यात आले.
आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रात जन्म दाखले, रहिवासी दाखले लवकरात लवकर द्यावेत, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच सरकारने हवालदारांचे प्रश्न सोडवण्याचीही मागणी केली. तर सावरकरांची माजी जन्मठेप ही विद्यार्थ्यांना शिवकवाच पण विद्यार्थ्यांनी त्यातील प्रत्येक पान अनं पान शिकवा, असे आव्हाड म्हणाले. फडणवीस म्हणतील तेच खरे, असा मिश्कील टोलाही आव्हाड यांनी फडणवीस यांना लगावला.
दरम्यान, विधासभेत आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन विधानसभेत गदारोळ सुरु झाला. हा कायदा राज्यात लवकरात लवकर अंमलात आणावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपकडून केली जात आहे.