नागपूर - ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या प्रक्रियेशी सर्व साखर कारखान्यांना कटिबद्ध राहावे लागणार असल्याचे वक्तव्य मंत्री जयंत पाटील यांनी केले. तसेच गुजरातमधील ऊस दराचा विचार करून महाराष्ट्रात असलेली तफावत दूर करून शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचे पाटील म्हणाले.
-
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देताना तडजोड केली जाणार नाही. या प्रक्रियेशी सर्व साखर कारखान्यांना कटिबद्ध राहावे लागेल. त्यासाठी विशेष समितीमार्फत गुजरात मधील दराचा विचार करुन महाराष्ट्रात असलेली तफावत दूर करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल.
— NCP (@NCPspeaks) December 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
- @Jayant_R_Patil pic.twitter.com/8Gh4sNSeu4
">ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देताना तडजोड केली जाणार नाही. या प्रक्रियेशी सर्व साखर कारखान्यांना कटिबद्ध राहावे लागेल. त्यासाठी विशेष समितीमार्फत गुजरात मधील दराचा विचार करुन महाराष्ट्रात असलेली तफावत दूर करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल.
— NCP (@NCPspeaks) December 20, 2019
- @Jayant_R_Patil pic.twitter.com/8Gh4sNSeu4ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देताना तडजोड केली जाणार नाही. या प्रक्रियेशी सर्व साखर कारखान्यांना कटिबद्ध राहावे लागेल. त्यासाठी विशेष समितीमार्फत गुजरात मधील दराचा विचार करुन महाराष्ट्रात असलेली तफावत दूर करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल.
— NCP (@NCPspeaks) December 20, 2019
- @Jayant_R_Patil pic.twitter.com/8Gh4sNSeu4
एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा असतानाही काही कारखाने 'तुकड्या तुकड्या'ने पैसे देतात. ज्या कारखान्याकडे शेतकऱ्यांची थकबाकी आहे, त्यांनी ती लवकरात लवकर देणे गरजेचे असल्याची मागणी सातत्याने सभागृहात केली जात होती. यावर बोलताना जयंत पाटील यांनी एफआरपीची रक्कम सर्व कारखान्यांना देणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील साखर कारखान्यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व या स्थितीतून या क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करणार असल्याचेही पाटील म्हणाले.