ETV Bharat / state

विशेष : अंबाझरी तलावात दोन किलोमीटर अंतर पोहून ईश्वरीने केले ध्वजारोहण - nagpur latest news

देशावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आज ईश्वरीने अंबाझरी तलावात तब्बल दोन किलोमीटर अंतर पोहून तलावाच्या मध्य भागी ध्वजारोहण करण्याची कामगिरी पार पडली आहे. तब्बल अडीच तास पोहून ईश्वरीने अंबाझरी तलावाच्या अगदी मध्यभागी असलेल्या खांबावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळवला आहे.

ishwari swam a distance of two kilometers in ambazari lake and hoisted flag in nagpur
विशेष : अंबाझरी तलावात दोन किलोमीटर अंतर पोहून ईश्वरीने केले ध्वजारोहण
author img

By

Published : Jan 26, 2021, 6:41 PM IST

Updated : Jan 26, 2021, 8:42 PM IST

नागपूर - भारतात आज प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. मात्र, नागपूरच्या एका दृष्टीहीन चिमुकलीने आजचा गणराज्य दिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. ईश्वरी पांडे असे या ११ वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. देशावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आज ईश्वरीने अंबाझरी तलावात तब्बल दोन किलोमीटर अंतर पोहून तलावाच्या मध्य भागी ध्वजारोहण करण्याची कामगिरी पार पडली आहे. तब्बल अडीच तास पोहून ईश्वरीने अंबाझरी तलावाच्या अगदी मध्यभागी असलेल्या खांबावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळवला आहे. महत्त्वाचे म्हणजे या पूर्वी कोणत्याही दृष्टी नसलेल्या व्यक्तीने तलावाच्या इतक्या आत जाण्याचा प्रयत्नदेखील केलेला नाही. त्यामुळे या प्रकारात ही कामगिरी करणारी ईश्वरी ही पहिली दृष्टी नसलेली जलतरणपटू ठरली आहे.

नागपुरकरांनी केले ईश्वरीचे स्वागत -

ईश्वरी पांडे या चिमुकलीने आज समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिलेला आहे. जगातील डोळस व्यक्तींना जे जमले नाही, ते या चिमुकलीने करून दाखवले आहे. सकाळी ज्यावेळी तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे तलावातील पाणी प्रचंड गार होते. त्यावेळी ईश्वरीन प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली आहे. ज्यावेळी ती परत आली तेव्हा तलावावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाने ईश्वरीचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

ईश्वरीने सर्व समस्यांवर मात केली -

ईश्वरी ही कमलेश आणि अरुणा पांडे यांची कन्या. ईश्वरीची आई अरुणा पांडे या केवळ सहा महिन्यांच्या गर्भवती असताना ईश्वरीचा जन्म झाला. ईश्वरी प्री-मॅच्युअर बेबी तिच्या अंगाचा पूर्णपणे विकास झाला नव्हता. जन्माच्यावेळी ईश्वरीचे वजन हे केवळ ७०० ग्राम इतकेच होते. म्हणूनच सुमारे अडीच महिने ती ऑक्सिजनवर होती. त्यावेळी तिच्या डोळ्याचा रेटिना हा पुर्णपने क्षतीग्रस्त झाला. त्यामुळे ती यापुढे कधीही हे सुंदर जग बघू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, हळू हळू ईश्वरीने सर्व समस्यांवर मात केली. एकाद्या दैवी चमत्कार व्हावा, असा प्रवास त्या चिमुकलीचा सुरू झाला. त्यामुळे पांडे दाम्पत्याने तिचे नाव ईश्वरी ठेवले होते. तिने देखील आपल्या नावाला साजेशी कामगिरी करून दाखवली आहे.

हेही वाचा - येरवडा जेल टुरिझममध्ये गांधी यार्ड, टिळक यार्ड, फाशी यार्ड पाहता येणार

Last Updated : Jan 26, 2021, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.